रत्नागिरी, दि. ०३ (प्रतिनिधी) : ‘महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे’तर्फे फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत रत्नागिरीतील श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन प्रशालेतील कै. बाबुराव जोशी गुरूकुल प्रकल्प विभागातील विद्यार्थीनी कु. पूर्वा आशिष चौघुले गुणवत्ता यादीत झळकली. तिने गुणवत्ता यादीत जिल्ह्यात सहावा क्रमांक मिळवला.
तिला प्रशालेतील शिक्षक श्री. वासुदेव परांजपे, श्री. अमोल पाष्टे, श्रीम. शर्वरी कशेळकर, सौ. अश्विनी तांबे यांचे मार्गदर्शन लाभले.
तिच्या या यशाबद्दल गुरुकुल विभाग प्रमुख श्री. नितीन लिमये, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली पाटणकर, प्राथमिक विभाग प्रमुख सौ.अपूर्वा मुरकर, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ. शुभदा पटवर्धन यांनी तसेच रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तिचे अभिनंदन केले आहे.








