गुहागर, दि. १० (उत्तम पवार): तळवली येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत केळस्कर, योगेश केळस्कर आणि कुटुंबियांकडून तळवली भडकंबा येथील गरीब गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. आपले वडील ‘गवळी समाज भूषण’ शंकर गोपाळ केळस्कर यांच्या 76 व्या वाढदिवसानिमित्त हा समाजोपयोगी स्तुत्य उपक्रम घेऊन सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
तळवली येथील प्रशांत केळस्कर यांचे धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात नेहमीच बहुमोल योगदान असते. नेहमीच विद्यार्थांच्या हितासाठी ते प्रयत्नशील असतात. त्यांनी गावामध्ये अनेकवेळा शाळा, कॉलेज येथे बोलताना सांगितले आहे की, माझ्या गावचा विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी खूप शिकावं, येथून IAS, IPS, डॉक्टर, इंजिनिअर निर्माण व्हावेत. यासाठी आवश्यक मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. शिक्षणाला अतिशय महत्त्व ते नेहमीच देत असतात. त्यामुळे प्रशांत केळस्कर यांनी आपल्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त देखील येथील गरीब, गरजू आणि होतकरू मुला – मुलींना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. त्यांचा हा आदर्श सर्वांनी नक्कीच घेण्यासारखा आहे.
प्रशांत केळस्कर हे मुंबई येथील लालबागचा राजा ट्रस्ट चे सदस्य आहेत. गावाप्रमाणे मुंबई मध्ये देखील त्यांचे सामाजिक कार्य सुरू








