खेर्डी (चिपळूण), दि. १४ : खेर्डी ग्रामपंचायतच्या वतीने श्रीकृष्ण सभागृहात इयत्ता १०वी, १२वी व पदवीधर गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, फुल, पेन व शालेय साहित्य देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन खेर्डी ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री. अभिजित ज. खोत यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सौ. जयश्री खोत, माजी सभापती सौ. सुलोचना मेश्री, माजी सरपंच श्री. विजय र. शिर्के, माजी उपसरपंच श्री. प्रकाश ब. पुजारे, सध्याचे सरपंच सौ. अपर्णा अ. दाते, उपसरपंच सौ. वैशाली मोरे, सदस्य सौ. दिप्ती सावंतदेसाई, श्री. संदीप कदम (ग्रामपंचायत अधिकारी), श्री. रमेश दगळेकर (गुरुजी) आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अमित आवळावे यांनी केले. विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.