लायन्स क्लब आयोजित गुड टच बॅड टचची यशस्वी सुरवात

चिपळूण, दि. ०८ (प्रतिनिधी): लायन्स क्लब चिपळूण युनिटी तर्फे चिपळूण शहर तसेंच ग्रामीण भागातील शाळांमध्ये राबवण्यात येणारा अभिनव उपक्रम गुड टच बॅड टचची यशस्वी सुरवात नुकतीच करण्यात आली.
लायन्स क्लब चिपळूण युनिटी तर्फे रोहित मेहता लायन्स क्वेस्ट वीकची सुरवात पालक व बालकांसाठी अभिनव उपक्रम- गुड टच व बॅड टच उपक्रमाने करण्यात आली.हे सेशन
लायन्स क्लब चिपळूण शहर व तालुक्यातील ग्रामीण शाळांमध्ये राबवत आहे.लायन्स क्लब चिपळूण युनिटीने सामाजिक बांधिलकीच्या नात्याने, अतिशय गरजेच असलेले असे एक सामाजिक सेवाकार्य म्हणून  याचे सेशन्स  घेतले आहे.   क्लिनिकल  सायकॉलॉजिस्ट  दीपिका आगवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे सेशन घेण्यात आले. या उपक्रमाची सुरवात जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक आगवे येथील शाळेत सोमवारी संपन्न झाले.
लहान मुला-मुलींमध्ये सामाजिक असुरक्षितता वाढल्यामुळे त्यांना चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श  याबद्दल जागरूक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चांगला स्पर्श म्हणजे ज्यामध्ये प्रेम, आपुलकी आणि सुरक्षितता वाटते, उदा. आई-वडील, शिक्षक किंवा जवळच्या व्यक्तीकडून मिळणारा स्पर्श. वाईट स्पर्श म्हणजे ज्यामध्ये अस्वस्थता, भीती किंवा घृणा वाटते, जसे की कोणीतरी विनाकारण हात लावणे, अश्लील स्पर्श करणे इत्यादी.समाजातील प्रत्येक व्यक्तीने या बाबतीत सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे आणि मुलांना सुरक्षित, सन्मानजनक आणि प्रेमळ वातावरण उपलब्ध करून दिले पाहिजे.या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक  संतोषकुमार भुवड सर शिक्षिका फायेमा कापडी, आणि शुभदा चाळके , लायन्स क्लब चिपळूण युनिटी चे सदस्य तसेंच ८० विद्यार्थी वर्ग तसेच पालक सहभागी होते.
मानसोपचार तज्ञ  ला.दीपिका अगवेकर क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट यांनी मुलांच्या सुरक्षिततेसाठी काही महत्त्वाचे असे नियम तसेच कोणती काळजी घ्यावी.गुड टच, बॅड टच यातील फरक समजावून सांगितला. पालकांना मुलांना त्यांच्या भावना बोलण्यासाठी मोकळेपणा द्या, त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण  करा असे सांगितले तसेच मुलांना त्यांच्या व्यक्तिगत सीमा कोणत्या आहेत हे समजावून सांगितले. त्याचप्रमाणे कोणत्याही स्पर्धा बद्दल अस्वस्थ असल्यास तसेच शंकित असल्यास नाही म्हणायला शिका.असे त्यांनी त्यांच्या सेशन मध्ये सांगितले.

आणखी वाचा