कुवारबावची बत्ती गुल ; महावितरणचा गोंधळ कारभार

रत्नागिरी (कुवारबाव), दि. 08 : रत्नागिरी शहरानजीक असणाऱ्या कुवारबाव येथील पत्रकार कॉलनी व जवळपासच्या परिसरातील एक फेस गेल्याने गेले 5 तास बत्ती गुल झाली आहे.
येथील नागरिकांनी वारंवार तक्रार करून देखील महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे.
पत्रकार कॉलनी येथील नागरिकांनी वारंवार हेल्पलाईन वर संपर्क केला असता कार्यालयातील मोबाईल क्रमांक बिझी – बिझी असल्याचे दाखवत होता. सदर मोबाईल क्रमांक नेहमी बिझी का असतो, येथील कर्मचारी कार्यालयीन फोनचा पर्सनल वापर करतात असा प्रश्न येथील नागरिकांनी व्यक्त केला आहे.
महावितरणच्या कुवारबाव येथील कार्यालयात फोन केला असता, कर्मचारी स्पॉट वर गेले आहेत, काम सुरु आहे.. असे सांगण्यात आले. परंतु स्पॉट वर कोणताही कर्मचारी उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले.
महावितरणच्या कुवारबाव येथील कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या गोंधळात… येथील नागरिकांची रात्र मात्र अंधारात जाणार आहे.

आणखी वाचा