मुंबई, दि. ०४ (क्षितिज कदम): महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रभाग क्रमांक 129 चे शाखाध्यक्ष अरविंद गीते यांच्या वतीने मनसे अध्यक्ष राजं ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 2 जुलै आणि 3 जुलै दिवस प्रभागात नोंदणी करण्यात आलेल्या एकूण 745 विद्यार्थांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या. विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांच्या मार्गदर्शनाखाली स्वस्त नव्हे तर मोफत या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे शाखाध्यक्ष अरविंद गीते म्हणाले. घाटकोपर पश्चिम पारशीवाडी येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.








