रत्नागिरी, दि. ०६ (प्रतिनिधी): उद्योजकता हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आज जगभर भारतीय अर्थव्यवस्था दैदिप्यमान वाटचाल मोठ्या दिमाखात करत आहे. या प्रगतीचा आपणही हिस्सा असलं पाहिजे. आपल्यातील उद्योजकतेला वेळीच ओळखून वाव दिला पाहिजे. खरतर उद्योजकतेचा हा प्रवास कठीण आणि खडतर! अशावेळी पाठीशी उभे राहण्याची सामाजिक मानसिकता निर्माण करणं ही काळाची गरज आहे, हीच बाब लक्षात घेऊन मराठी उद्योजकांना एकत्र आणण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट या सामाजिक संस्थेच्या रत्नागिरी चॅप्टरने उद्योजकता परिसंवाद या कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे.
हा कार्यक्रम दि. ०७ रोजी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह येथे दुपारी दोन वाजल्यापासून सुरू होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री श्री उदय सामंत मार्गदर्शन करतील. तसेच सॅटर्डे क्लबचे चेअरमन, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अशोक दुगाडे क्लबच्या माध्यमातून व्यवसाय वृध्दी कशी करावी याविषयी मार्गदर्शन करणार आहेत.
आपला कोकण हा चाकरमानी म्हणवून घेण्यात इतीपूर्तता मानत
होता. परंतु बदलत्या काळाची पावल ओळखून आपला तरुण धडपडत का होईना स्वतःच अस्तित्व व्यवसायाच्या माध्यमातून निर्माण करू पाहतोय, तर काही मराठी उद्योजकांनी चांगला ब्रँड निर्माण केलाय. अशा सर्व मराठी उद्योजकांनी एकत्र यावं. एकमेकांच्या व्यवसाय वाढीसाठी मदत करावी, अडचणी समजून घेवून त्यावर उपाययोजना कराव्यात, अशा प्रकारे एकमेकांना सहाय्य करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या माध्यमातून निर्माण केला गेला आहे.
अशा या सॅटर्डे क्लब ची कार्यपद्धती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि मराठी समाज म्हणून मराठी उद्योजकांच्या पाठीशी उभ राहण्यासंदर्भात आव्हान करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे.
सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट तर्फे रत्नागिरीतील तमाम लोकांना उद्योजकता परिसंवाद या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान करण्यात येत आहे.
तारीख – ७ जुलै २०२४
वेळ – दुपारी २.०० वाजता
स्थळ – स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह, मारुती मंदिर, रत्नागिरी.
सदर कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे तरी निमंत्रण पत्रिकेसाठी खालील नंबर वरती संपर्क साधावा…..
श्री. राजेश शेट्ये- 9860684567
श्री. प्रकाश भुरवणे- 8275919821
सौ. देवयानी वाघधरे- 9156104688








