मुंबई, दि. ०४ (क्षितिज कदम): गुजराती आणि इंग्लिश वृत्तपत्रात प्रसिद्ध असलेल्या मिड-डे ग्रुप च्या माध्यमातून नुकतेच मुंबईतील नामांकित व प्रतिष्ठित लोकांना मिड-डे गौरव आयकॉन 2024 हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. घाटकोपर विद्याविहार विभागात राजकीय, सामाजिक व बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेले धर्मेश गिरी यांचे धाकटे बंधू , गिरी डेव्हलपर्स चे संचालक भावेश गिरी यांना मुंबईतील नामांकित असा मिड-डे गौरव आयकॉन 2024 हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
भावेश गिरी यांनी गिरी डेव्हलपर्स च्या माध्यमातून बांधकाम क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. भावेश यांनी बांधकाम व्यवसायात एक प्रभावी व्यक्तिमत्त्व अशी छाप पाडली असताना त्याची विशेष पुरस्कारासाठी मिड-डे या समूहाने निवड करत मिड-डे गौरव आयकॉन 2024 हा पुरस्कार भावेश गिरी यांना दिला आहे.
भावेश गिरी यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे. घाटकोपर चा राजा गणेशोत्सव आणि महाकाल मित्र मडळासह विभागातील अनेक संस्थांनी व सामजिक कार्यकर्त्यांनी भावेश गिरी यांचे अभिनंदन केले आहे.








