शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

मुंबई, दि. ०४ (क्षितिज कदम): शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांचं नावं ऐकल की डोळ्यासमोर उभा राहतो त्यांचा पावनखिंडीतला इतिहास. लाख मेले तरी चालतील पण लाखोंचा पोशिंदा जगला पाहिजे म्हणत दोन्ही हातांनी समशेर चालवत सिद्धीची सेना खिंडीत थोपवून धरणारे बाजी प्रभू आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त घाटकोपर पूर्व येथील बाजी प्रभू मंडळाच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

पूर्व येथील उभारण्यात आलेल्या शूरवीर बाजी प्रभू देशपांडे यांच्या शिल्पास पुष्पहार अर्पण करत हर हर महादेव गर्जना देत त्यांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी बाजी प्रभू मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते खिमजीभाई पटेल , रमेश पवार , घाटकोपर पूर्व विधानसभा संघटक अशोक वंडेकर, चंद्रकांत गायकवाड , प्रकाश केदारे , शरद शिंदे , दिनेश सावंत , मधुकर खेडेकर , जगदीश विचारे आदी उपस्थित होते.

आणखी वाचा