नितीन गडकरींनी इंडिया आघाडीमध्ये यावं. आम्ही त्यांना पंतप्रधान केल्याशिवाय राहणार नाही- खासदार विनायक राऊत

 

रत्नागिरी, दि. 20 : येत्या ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईमध्ये इंडिया आघाडीची बैठक होत आहे. त्यापूर्वीच इंडिया आघाडीतील एका पक्षाच्या नेत्याने थेट गडकरींना पंतप्रधानपदाची ऑफर दिली आहे. कॅगच्या अहवालामध्ये गडकरींच्या खात्यावर ठपका ठेवण्यात आल्याने उलटसुलट चर्चा सुरु झालेल्या आहेतशिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी गडकरींना संपवण्याचा दिल्लीतून कट रचला जात असल्याचं म्हटलं आहे. त्यांनीच गडकरींना पंतप्रधानपदाची ऑफर देऊ केलीय.नितीन गडकरी हे पंतप्रधान पदाचे दावेदार होतील म्हणून दिल्लीमधल्या नतद्रष्ट लोकांनी त्यांना संपवण्याचा कट रचला आहे. हा कट उधळून लावण्याचं काम महाराष्ट्र करेल. गडकरी यांना विनंती आहे की, त्यांनी मराठी माणसाचं पाणी दिल्लीकरांना दाखवून द्यावं.

राऊत पुढे म्हणाले की, नितीन गडकरींनी इंडिया आघाडीमध्ये यावं. आम्ही त्यांना पंतप्रधान केल्याशिवाय राहणार नाहीत. असा शब्द उद्धव ठाकरेसुद्धा देतीत. फक्त गडकरींनी दिल्लीकरांना घाबरु नये.

आणखी वाचा