ग्रामपंचायत आपटी बोरघर मार्फत एक पेड माँ के नाम 2.0 अभियान यशस्वी

दापोली, दि. ०५ : आज दिनांक 05 जून रोजी ग्रामपंचायत आपटी बोरघर मार्फत जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने एक पेड माँ के नाम 2.0 अभियान राबविण्यात आले त्यावेळी 150 लाल चंदनाच्या वृक्षांचे ग्रामस्थ, विद्यार्थी यांना वाटप करण्यात आले. त्यावेळी ग्रामपंचायत सरपंच संपदा संदिप आग्रे, उपसरपंच अस्मिता भेकरे , सदस्य संतोष घडवले, सोनाली कदम ग्रामपंचायत अधिकारी मानसी विलास साळुंके, माजी तंटामुक्त अध्यक्ष, आशा सेविका व ग्रामपंचायत कर्मचारी व बहु संख्येने ग्रामस्थ, व विद्यार्थी उपस्थित होते.
त्या वेळी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात वृक्षांची लागवड करण्यात आली. सरपंच यांनी चंदनाच्या झाडांचे महत्व विषद करून वृक्ष संवर्धनाची माहिती दिली.
या उपक्रमास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आपटी बोरघर ग्रामपंचायत मध्ये असे विविध कार्यक्रम होतात त्याबाबत ग्रामस्थानी समाधान व्यक्त केले.

आणखी वाचा