महाड, दि. २६ (अनिल फाळके): पीपल्स एज्यूकेशन सोसायटी मुंबई चे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय महाडचे उपप्राचार्य प्रा. राकेश श्रीकांत सोनार यांना वाणिज्य व व्यवस्थापन शाखेत पीएच.डी. पदवी दिनांक 7/03/25 रोजी प्रदान करण्यात आली.
प्रा. राकेश श्रीकांत सोनार यांनी ‘ए स्टडी ऑन इनवेन्टरी मॅनेजमेंट ऑफ फार्मासेटीकल्स इंडस्ट्रीअल युनिट इन रायगड डीस्ट्रीक’. या विषयावर त्यांनी आपले संशोधन पूर्ण केले.
प्रा. राकेश श्रीकांत सोनार यांचे संशोधनपर शोधनिबंध स्कोपस इंडेक्स डब्लू.ओ.एस तसेच यु.जी.सी. सारख्या राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय दर्जाच्या शोधपत्रिकेत प्रकाश झाले आहेत.
प्रा. राकेश श्रीकांत सोनार यांनी केलेल्या संशोधनाचा फायदा व्यवसाय, भागधारक व समाजाला नक्कीच होईल.
त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल महाविद्यालयात आनंदाचे वातावरण असून, त्यांनी आपले मार्गदर्शक डॉ. ए.बी.वाघमारे तसेच, परिक्षक मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ.ए.एम.गुरव, बाह्य परिक्षक डॉ. आशुतोष गाडेकर आणि डॉ. के.व्ही. मरूळकर यांचे विशेष आभार मानले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. योगेश प्रभाकर बोराळे यांनी विशेष अभिनंदन केले. तसेच त्यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीने तसेच सहकारी प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.








