निवळी घाटात कंटेनरचा अपघात

रत्नागिरी, दि. १० (अभिजित जाधव): रत्नागिरीजवळील निवळी घाटात आज (१० सप्टेंबर) रात्री अपघाताची घटना घडली. जयगड पोर्टवरून मुंबई जेएनपीटी पोर्टकडे जाणारा कंटेनर (क्र. MH43 Y8843) घाटातील वळणावर गाडीचे ब्रेक फेल झाल्याने पलटी झाला.
या अपघातात कंटेनर चालक दिपू सिंग
निवळी घाटात अपघातग्रस्त कंटेनर (क्र. MH43 Y8843) : (छायाचित्र – अभिजित जाधव, रत्नागिरी)
यांना किरकोळ दुखापत झाली असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. मात्र पलटी झालेल्या कंटेनरमुळे घाटातील वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
अपघातग्रस्त कंटेनर रस्त्याच्या मधोमध अडकून राहिल्याने थोड्याप्रमाणात वाहनांची कोंडी झाली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी कंटेनर बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

आणखी वाचा