रत्नागिरी, दि. ०३ (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली असून त्याची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे पाच लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत. अशी माहिती राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली.
मंगळवारी या योजनेमध्ये काही नियम व अटी यांच्यामध्ये शिथिलता आणण्यात आली आहे त्यामुळे या योजनेचा लाभ महिलांना घेता येणार आहे. शिवसेना पक्षाच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भव्य दिव्य असे कॅम्प आयोजित करून जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ कसा देता येईल यासाठी सर्वतोपरी मदत कार्य करण्यात येणार आहे.
या योजनेच्या अनुषंगाने तहसील कार्यालयामध्ये जे लोक येतील त्यांच्याकरिता पावसाळ्याच्या अनुषंगाने वॉटरप्रूफ शेड उभारण्यात यावी मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करण्यात यावी त्याचप्रमाणे महिला पोलिसांची देखील उपस्थिती असावी अशा प्रकारचे निर्देश देण्यात आले आहेत.








