परशुराम घाट खचला

चिपळूण, दि. २१ (प्रतिनिधी):  मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या परशुराम घाटात संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. परशुराम घाटातील पॅकेज ४ मध्ये आज सकाळी एका बाजूचा भराव खाली आला आहे. वाहतुकीकरीता एक लेन बंद करण्यात आली आहे. मुंबईहून चिपळूणच्या दिशेने जातानाची एक मार्गीका वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे याही पावसाळ्यात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या मर्यादा उघड झाल्या आहेत. रात्रीपासून संरक्षक भिंत कोसळून मलबा गटारात वाहून अद्यापही संरक्षक भिंत कोसळत आहे. दीड किलोमीटर लांबीची आहे संरक्षक भिंत मुंबई गोवा महामार्गाचे काम परशुराम घाटातून होत असताना खुदाई केल्यानंतररस्ता वाहून जाऊ नये यासाठी बांधली गेली होती. मात्र या संरक्षण भिंतीनाचा आता धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे यावर्षीच्या पावसाळ्यातही परशुराम घाटातील धोका अद्यापही कायम आहे

गेले कित्येक वर्षे अत्यंत धीम्यागतीने सुरू असलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची यावर्षी पावसाळ्यात अवस्था अनेक ठिकाणी दयनीय आहे. कुठे रस्ता खचला तर कुठे दरड कोसळली कुठे संरक्षक भिंतीला तडे अशी सगळी परिस्थिती आहे. त्यामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या काही ठिकाणी बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पहिल्याच पावसात महाड तालुक्यात दरड कोसळण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. भोस्ते घाटातील अवघड वळणावरील महामार्ग खचला आहे. महामार्ग आणि संरक्षक भिंती दरम्यान दोन ते तीन फूट खोल भेगा पडल्या आहेत. रंरक्षण भिंत देखील खचली केव्हाही कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे.

पेढे व परशुराम येथील घरांना धोका कायम-
राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणामुळे पेढे व परशुराम येथील अनेक घरांनाही दरडींचा धोका अद्यापही कायम आहे. दरवर्षी येथील घरांना स्थलांतराच्या नोटिसा देण्यात येतात मात्र अद्यापही पेढे व परशुराम येथील दरडींचा धोका असलेल्या

घरांना कोणतीही संरक्षक भिंत बांधण्यात आलेले नाही यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाकडून वेळोवेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पत्रव्यवहार पाठपुरावा करण्यात आला आहे. पेढे परशुराम या दोन्ही गावांना जोडणारी पारंपरिक पायवाटही या महामार्गाच्या रुंदीकरणात उध्वस्त करण्यात आली. मात्र या ठिकाणीही ब्रिज अथवा पाखाडी अद्याप बांधण्यात आलेली नाही त्यामुळे शाळेतील मुले, शेतकरी यांना जाण्याचा मार्गही बंद झाला आहे. केवळ आश्वासन पलीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकाऱ्यांकडून कोणतीही आश्वासनपूर्ती केली जात नाही अशी प्रतिक्रिया परशुराम ग्रामपंचायतीच्या सरपंच गायत्री जोगळे यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ जवळ बोलताना दिले आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या परशुराम थांबा येथे फूटब्रीज मागणी करण्यात आली होती. मात्र तीही अद्याप अपूर्ण असल्याने हे ठिकाणही धोका दायक झाल आहे.

आणखी वाचा