प्रशांत यादव यांच्या रूपाने शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादीला मिळणार कोकणातून नवा आमदार
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पक्षप्रमुख शरदचंद्रजी पवार यांच्या पाठबळामुळेच चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या नव्या प्रशांत पर्वाला सुरुवात होत आहे .प्रशांत यादव आमदार होण्यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसली असून विधानसभा मतदारसंघांमध्ये कार्यकर्ते पूर्ण ताकतीनिशी कामाला लागले आहेत. महाविकास आघाडी यांच्यासह सर्वच पक्षातून यादव यांच्या नावाला पसंती मिळताना दिसत आहे.
ती लोकप्रियता लक्षात घेता शरदचंद्रजी पवार यांनी प्रशांत यादव रुपी मोहरा हेरण्याचे ठरवून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्यापासूनच खा. पवार यांनी प्रशांत यादव यांना राष्ट्रवादी पक्षाकडून लागेल ती ताकद देण्याचे ठरविले आहे.आगामी विधान
सभा निवडणुकीमध्ये महाविकास आघा
डी कडून प्रशांत यादव हे संभाव्य उमेदवार असू शकतात असे बोलले जाते तर महायुतीकडून विद्यमान आमदार शेखर निकम हे निवडणूक लढवू शकतात दरम्यान चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील या हेवीवेट फाईट (लढतीकडे) संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहणार आहे.