एम्.पी.एस्.पी आणि बी.डी.एस्.स्पर्धांतून प्रेमजीभाई आसर शाळेचे घवघवीत यश

चिपळूण, दि. ०५ (प्रतिनिधी): परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित प्रेमजीभाई आसर प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा व ब्रेन डेव्हलपमेंट शिष्यवृत्ती परीक्षा या दोन्ही परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले आहे.

महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे-
इयत्ता -दुसरी
१) सई किशोर आंब्रे (गुणवत्ता यादीत राज्यात १३९ वी)
२) श्रीवेद रविंद्र गावकर (गुणवत्ता यादीत राज्यात १८२ वा)

इयत्ता -तिसरी
१) वेदांग महेश बेडेकर (गुणवत्ता यादीत राज्यात १८ वा)
२) दुर्वा सचिन सलागरे (गुणवत्ता यादीत राज्यात ५६ वी)
३) अनय विजयकुमार शनवाडे (गुणवत्ता यादीत राज्यात ८२ वा)
४) वरद नरहरी काळे (गुणवत्ता यादीत राज्यात ११४ वा)
५) तेजस्विनी प्रसाद करंदीकर (गुणवत्ता यादीत राज्यात १३७ वी)
६) अनिकेत किरण पागडे (गुणवत्ता यादीत राज्यात १७४ वा)

इयत्ता :- चौथी
१) स्पृहा उज्वल कलवारी (गुणवत्ता यादीत राज्यात ३८ वी)
२) आराध्या गणेश ढवळे (गुणवत्ता यादीत राज्यात १२४ वी)
३) नील मकरंद रानडे (गुणवत्ता यादीत राज्यात १६४ वा)
या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सुयश प्राप्त केले. तर ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप(B.D.S.)

परीक्षेत पुढील विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे –

इयत्ता पहिली
१) ओवी नंदकुमार चव्हाण (८८ गुण / ब्रॉंझ मेडल)
२) युगंधर योगेश देसाई (८५ गुण/ ब्रॉंझ मेडल)

इयत्ता :- दुसरी
३) अन्वी दिनेश जाक्कर (९४ गुण / सिल्व्हर मेडल)
४) सई किशोर आंब्रे (९२ गुण/सिल्व्हर मेडल)
५) आरोही विजय सापते (९१ गुण / ब्रॉंझ मेडल)
६) अनिश समीर भायजे (८९ गुण / ब्रॉंझ मेडल)

इयत्ता तिसरी
७) दुर्वा सचिन सलागरे(९२ गुण/ सिल्व्हर मेडल)
८) तेजस्विनी प्रसाद करंदीकर(८६ गुण/ ब्रॉंझ मेडल)

या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल शालेय समितीच्या अध्यक्षा सौ. वैशाली निमकर व शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. संगीता नाईक यांनी विद्यार्थ्यांचे, पालकांचे आणि या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.

आणखी वाचा