प्रेमजीभाई आसर प्राथ. शाळेत योगदिन साजरा

चिपळूण, दि. २१ : प.ए.सोसायटी,चिपळूण संचालित प्रेमजीभाई आसर प्राथमिक शाळेत जागतिक योग दिनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी आणि चिपळूणमधील प्रसिद्ध योग शिक्षिका श्रीम.शांभवी श्रीधर यमकनमर्डी उपस्थित होत्या.

आजच्या प्रमुख मार्गदर्शकांचे स्वागत प्रशालेच्या मुख्याध्यपिका श्रीम. संगिता नाईक मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. शर्मिलामोडक मॅडम,सौ. प्राची गगनग्रास मॅडम तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती संगीता नाईक मॅडम यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून दैनंदिन जीवनातील योगाचे महत्त्व सोप्या सोप्या उदाहरणातून विद्यार्थ्यांना पटवून दिले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांची ओळख सौ.प्राची गगनग्रास मॅडम यांनी उपस्थितांना करून दिली.

योगदिनानिमित्त प्रार्थना व संकल्प सौ.गगनग्रास मॅडम यांनी विद्यार्थ्यांना सांगितला. शाळेचे शिक्षक श्री.मांडवकर सर यांनी योगगीत सांगितले. त्यानंतर योगशिक्षिका श्रीम.शांभवी यमकनमर्डी यांनी विद्यार्थ्यांना योग व आपल्या जीवनामध्ये व्यायामाचे महत्त्व याबद्दल अधिक माहिती देवून विद्यार्थ्यांकडून योगाची प्रात्यक्षिके करून घेतली.

यामध्ये, वृक्षासन, त्रिकोणासन, ताडासन , प्राणायाम, ओंकार यासारख्या योगासनांचे प्रात्यक्षिके करून घेतली. विद्यार्थ्यांचे मन वेधून घेण्यासाठी पूरक हालचाली करून घेतल्या.विद्यार्थ्यांनी मनापासून योग प्रात्यक्षिके केली. योग मार्गदर्शकांचे भेटवस्तू व गुलाब पुष्प देवून आभार मानण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाळेचे शिक्षक श्री.आशिष मांडवकर यांनी केले.

आणखी वाचा