शिष्यवृत्ती परीक्षेत रा.भा. शिर्के प्रशालेचे घवघवीत यश

रत्नागिरी, दि. ०४ (प्रतिनिधी) : पूर्व उच्च प्राथमिक व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२४ मध्ये र.ए. सोसायटीच्या रा.भा. शिर्के प्रशालेचे १७ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादी झळकले. इयत्ता ८वी चे १३ विद्यार्थी तर इयत्ता ५वी चे ४ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आले . विद्यार्थ्यांची मेहनत ,प्रशालेतील शिक्षकांचे सातत्याने होणारे मार्गदर्शन व शंका निरसन, प्रश्नपत्रिकांचा सराव, पालकांचे मार्गदर्शन ष पदाधिकाऱ्यांचे प्रोत्साहन यामुळे हे यश प्राप्त झाले.

इयत्ता ८वी गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे-
वेदांत बाबुराव सनये, वेद भगवान डोईफोडे, वेदांतिका बापूसाहेब पवार, निशा नारायण मालशे, रुचिर राहुल आजगावकर, समृद्धी अनंत पांचाळ, साजरी निलेश रसाळ, पृथा विलास पांचाळ, नितीन अनंत बोडेकर, पायल दिनेश वासावे, पलक संजय दुदम, प्रांजल प्रकाश नेवरेकर, रुद्र संजय गोरे. या विद्यार्थ्यांना सौ. स्नेहा साखळकर, सौ. अनया अभ्यंकर, सौ .श्वेता कांबळे सौ. प्रियंका नाखरेकर यांनी मार्गदर्शन केले.

इयत्ता ५वी गुणवत्ता यादीतील विद्यार्थी पुढील प्रमाणे-
अजिंक्य अमर घोसाळकर, मैत्रेयी सुनील जाधव, शांभवी शिरीष शेंबवणेकर, गार्गी महेश ठसाळे. या विद्यार्थ्यांना सौ.तेजस्विनी यादव, श्री. सुभाष कुवर, श्री .युवराज महाले, श्री. प्रशांत जाधव यांनी मार्गदर्शन केले.

शिष्यवृत्ती परीक्षेतील या घवघवीत यशाबद्दल र.ए. सोसायटीचे सर्व पदाधिकारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. कुमारमंगल कांबळे, पर्यवेक्षिका सौ. पूनम जाधव यांनीही सर्व यशस्वी विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षक व पालक यांचे अभिनंदन केले.

आणखी वाचा