राजापूर, दि. ११ (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या राजापूर तालुक्यातील कशेळी गावातील पवित्र भूमीत सोमवार दिनांक ९ सप्टेंबर २०२४ रोजी. युवा ग्रुप वाडीवठार (कशेळी) तर्फे गणेशोत्सवा निमित्ताने रक्तदान शिबीर आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिरात गावातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शविला. एकुण ३१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सोबतच कशेळी गावातील पाचही प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. निबंध स्पर्धेत एकुण ८६ विद्यार्थ्यांनी सहभागी झाले होते. त्यांचे दोन गटात विभाजन करण्यात आले होते.
प्रथम क्रमांक
कु.स्वानंदी मंदार जायदे.
इयत्ता – चौथी कु.आर्या भरत धावडे. इयत्ता – सातवी द्वितीय क्रमांक
कु.आदिती योगेश मेस्ञी.
इयत्ता – चौथी कु.सलोनी सुनिल दळवी. इयत्ता – सातवी, तृतीय क्रमांक
कु.निधी योगेश वाडकर.
इयत्ता – तिसरी कु.तन्वी संतोष गोठणकर.
इयत्ता – सातवी उत्तेजनार्थ
कु.आरोही अनिल डुकळे.
इयत्ता – तिसरी
कु.आराध्या अनिल थारळी. इयत्ता – दुसरी
कु.रुद्र भिकाजी बावकर.
इयत्ता – सातवी कु.अनुजा आनंद माळी.
इयत्ता – सहावी दोन्ही उपक्रमांना यशस्वी करण्यासाठी नवयुग वाडीवठार वाडीचे अध्यक्ष प्रकाश डुकळे, सुधाकर नाटेकर, प्राथमिक शाळांचे केंद्रप्रमुख सुनिल जायदे गुरुजी, युवा ग्रुप वाडीवठार अध्यक्ष मंदार डुकळे, यांचे विषेश मार्गदर्शन लाभले. त्याचसोबत कशेळी गावच्या सरपंच सौ. हळदणकर मॅडम,उपसरपंच नंदकुमार फोडकर,पो.पा.प्रमोद सुतार, संदिप राडये, डॉ.कैलास भागवत, डॉ.कांबळे, चंद्रकांत राडये, कशेळी विकास परिसर मंडळ अध्यक्ष महेंन्द्र भोसले, साई सेवा प्रतिष्ठान संस्थापक सुशिल तांबे, उप जिल्हाप्रमुख संजय साळवीजी, सुभाष मालप ,प्रकाश गुरव तसेच वाडीवठार वाडीचे इतर ग्रामस्थ यांची उपस्थिती लाभली. सर्व उपस्थितांचे आभार आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या उपक्रमाचे विविध स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.