इंग्रजांच्या काळापासून सुरु असलेले रत्नागिरीतले प्रादेशिक मनोरुग्णालय बंद होणार?

रत्नागिरी, दि. ०९ (प्रतिनिधी): इंग्रजांच्या काळापासून रत्नागिरीत सुरू असलेल्या प्रादेशिक मनोरुग्णालयात आधीच 50 टक्क्यांहून अधिक वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी पदे रिक्त असताना आता आकृतिबंधानुसार मंजूर असलेली पदे कोल्हापुरातील जयसिंगपूर उदगाव येथे नव्याने होत असलेल्या 365 खाटांच्या प्रादेशिक मनोग्णालयासाठी वर्ग करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे रत्नागिरी येथील प्रादेशिक मनोरुग्णालय बंद होणार की काय, अशी भीती व्यक्त होत आहे.

रत्नागिरीतील प्रादेशिक मनोग्णालय रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांसाठी आहे. रुग्णालयास सुमारे 365 खाटांची मंजुरी आहे. सध्या 150 हून अधिक रुग्णांचा भार सांभाळण्याची जबाबदारी पेलावी लागते. या रुग्णालयात एकूण 144 मंजूर पदे आहेत. त्यापैकी 50 टक्के पदे रिक्त आहेत. त्यामध्ये वर्ग 1 आणि चतुर्थश्रेणी, ब गट, क गट अशा पदांचा समावेश आहे. रुग्णांची संख्या अधिक असल्याने या रुग्णांची देखभाल करण्यासाठी आवश्यक असलेली कार्यालयीन पदे रिक्त आहेत. रुग्णांच्या सुरक्षेच्या द़ृष्टीने रुग्णालय प्रशासनाला कमी कर्मचार्‍यांमध्येच सध्या लक्ष ठेवावे लागत आहे. त्यामुळे कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांवर मोठा ताण येत आहे.

कोल्हापूर, सांगली व सातारा आणि सीमा भागातील रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मनोरुग्णालयात पुणे किंवा रत्नागिरी येथे जावे लागते. त्यामुळे गेली अनेक वर्ष कोल्हापूरमध्ये मनोरुग्णालय व्हावे, यासाठी प्रयत्न सुरु होते. पश्चिम महाराष्ट्रातील रुग्ण व नातेवाईकांची अनेक वर्षांपासूनी मागणी लक्षात घेत कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यातील उदगाव येथे रत्नागिरीच्या धर्तीवर 365 खाटांचें प्रादेशिक मनोग्णालय स्थापन करण्याबाबता असलेला प्रस्तावास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

त्यानुसार खर्चास निधी टप्प्याटप्प्याने उपलब्ध करुन दिला जाणार आहे. या मनोग्णालयाचे 75 टक्के बांधकाम पूर्ण झाल्यानंतर वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने प्रादेशिक मनोग्णालय रत्नागिरीसाठी आकृतीबंधानुसार मंजुर असलेली पदे उदगांव येथील मनोग्णालयासाठी तत्काळ वर्ग करण्यासही मान्यता दिली आहे. दीडशे वर्षापूर्वीच्या या मनोरुग्णालयाकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होत असल्याने, येथील मनोरुग्णालय बंद झाल्यास आता रत्नागिरी व सिंधुदुर्गतील रुग्णांचे हाल होणार आहेत.

आणखी वाचा