हॅपी मेडीकेअर सेंटर रत्नागिरीचा ”पूर्व कालीन जीवनशैली आणि आजची जीवनशैली” यावरील आकर्षक देखावा

रत्नागिरी, दि. २४ : हॅपी मेडीकेअर सेंटर रत्नागिरी तर्फे सालाबाद प्रमाणे याही वर्षी गणेशोत्सव साजरा करण्यात आला यावेळी आरोग्य विषयक माहिती देवून थेरपीचे महत्व सांगितले थेरपी ही एक बाह्य उपचार पध्दत असून त्याचा साईड इफेक्ट नाही.
विभागिय व्यवस्थापक प्रभाकर शिंदे आणि त्यांचा कर्मचारी वर्ग व थेरपीचे लाभार्थी यांनी या वर्षासाठी पूर्व कालीन जीवनशैली आणि आजची जीवनशैली या बाबतचा देखावा मुर्तींच्या स्वरूपात सादर केला होता.
त्या देखाव्याला जनतेकडून उत्फूर्त प्रतिसादही मिळाला.तसेच थेरपी बाबत समाधान व्यक्त करित जेष्ठ नागरिकांनी आपल्या आरोग्याबाबत दिलासा व्यक्त केला.कोकण विभाग प्रमुख धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 11 वर्षे ही सेवा चालू असून याबाबत लाभार्थ्यानी समाधान व्यक्त केले आहे.

आणखी वाचा