सहदेव बेटकर यांची भाजपच्या रत्नागिरी दक्षिण ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

रत्नागिरी, दि. ३० : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मंगळवारी (३० जून) सहदेव बेटकर यांची भाजपच्या रत्नागिरी दक्षिण ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सहदेव बेटकर यांच्यावर पक्षाने महत्त्वाची जबाबदारी सोपविल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ओबीसी समाजातील संघटनात्मक कामाला अधिक बळ मिळावे, या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.

यावेळी भाजपचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, भाजप नेते वैभव खेडेकर, जिल्हा उपाध्यक्ष बळीराम मोरे, जिल्हा चिटणीस तथा चिपळूण तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष योगेश शिर्के, जिल्हा कार्यकारिणी सदस्य चंद्रकांत जाधव, महिला मोर्चा अध्यक्षा तथा भिलेच्या सरपंच आदिती गुडेकर, उपाध्यक्ष सुहास भागडे, सचिव विकास गमरे, सहसचिव सदानंद पवार, सदस्य श्रेया वीरकर, नम्रता मोहिते, सल्लागार संदीप जाबरे आणि सुनील वाजे यांच्यासह चिपळूण तालुक्यातील अनेक सरपंच, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नियुक्तीनंतर सहदेव बेटकर यांनी पक्षाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त करत ओबीसी समाजाचे संघटन मजबूत करण्यासाठी आणि पक्षाची भूमिका तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

आणखी वाचा