कडवईमध्ये घरावर झाड कोसळून मोठे नुकसान ; सुदैवाने जिवित हानी नाही

संगमेश्वर, दि. २४ (प्रतिनिधी) : गेले चार दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाने कडवई मुस्लिम मोहल्ल्यातील साजिदा अहमद जुवळे याच्या घरावर शेजारी राहणाऱ्या सिकंदर मुल्ला यांचे फणसाचे झाड कोसळल्याने घराचे फार नुकसान झाले.

सुदैवाने झाड कोसळले तेव्हा घरातील सदस्य आतल्या खोलीत असल्याने कोणाला काही इजा झाली नाही परंतु घराच्या दोन खोल्याची कौले व पाण्याची टाकी फुटून सुमारे ५०,००० रुपयांचे नुकसान झाले. कौले फुटल्याने घरात पावसाचे पाणी घुसून घरातील वस्तूंचे नुकसान झाले.

तलाठी ऑफिसच्या किशोर तांबे व सहकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा केला यावेळी उपसरपंच दत्ताराम ओकटे उपस्थित होते.

आणखी वाचा