कोणी कितीही वलगना केल्या तरी साहेबांच्या शिवाय पर्याय नाही – माधवी गिते

संगमेश्वर, दि. ११ (अमृत जाधव): नुकतीच नावडी जि.प. गटाची येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात गटातील पदाधिकारी, सरपंच, कार्यकर्ते, महिला आघाडी यांची बैठक संगमेश्वर येथे आयोजित केली असता सर्वाना मार्गदर्शन करतेवेळी त्या म्हणाल्या की खाडी पट्टा हा नामदार उदयजी सामंत साहेबांचा बालेकिल्ला आहे. विरोधकांना ह्या पट्ट्यात थारा नाही. कोणी कितीही प्रयत्न केले तरी सामंत साहेबा शिवाय पर्याय नाही. खाडी पट्टा मोठे मताधिक्य देणार. हि आमची सर्वांची खात्री आहे.
सन 2009 साली संगमेश्वर चिपळूण विधानसभा मतदार संघाचे विभाजन झाले असता संगमेश्वर तालुक्यातील खाडी पट्ट्यातील 26 गावे रत्नागिरी विधानसभा मतदार संघाला जोडली गेली. आमचे सर्वांचे भाग्य खऱ्या अर्थाने खाडी पट्ट्याला मा. ना. उदयजी सामंत साहेबांच्या रूपाने एक धडाकेबाज खंबीर मिळाले व खाडी पट्ट्याच्या विकासाला चालना मिळाली. साहेबांनी सर्वच क्षेत्रामध्ये रत्नागिरीच्या विकासाबरोबर आमच्या खाडी पट्ट्याला सुद्धा झुकते माप दिले आहे.
साहेबांना तंत्र शिक्षण, उद्योग अशी संधी मिळाली त्याच बरोबर आता पालक मंत्री या संधीचे त्यांनी सोने केले. व मंत्री कसा असावा हे महाराष्ट्राला दाखवून वेगळी ओळख करून दिली आहे. पालक मंत्री झाल्या नंतर साहेबांनी खाडी पट्ट्याला प्रत्येक गावाला कमीत कमी 5 कोटींचा निधी दिला असून त्यामध्ये ग्रा. प. इमारत, शाळा, बहू उद्धेशीय सभागृह, बचत गटांना इमारत, प्रा. आ. केंद्र इमारत, अंगणवाडी, रस्ते, पाणी अशी विकास कामे असल्याने आमच्या भागातील जनतेशी नाळ जोडली गेली आहे.
सन 2017 साली जि. प. ची निवडणूक झाली. त्यावेळी सामंत साहेबांनी मला नावडी जिल्हा परिषदेचे नेतृत्व करण्याची संधी दिली. मी कुणबी समाजातील शेतकरी घराण्यात माझा जन्म झाला. कोणतीही राजकीय पार्शभूमी नसताना साहेबांनी मला संधी दिली. त्याला मी प्रामाणिक न्याय देण्याचा प्रयत्न केला.
यावेळी खाडी पट्ट्यातील जि. प. माजी उपाध्यक्ष राजेश मुकादम, उपसभापती परशुराम वेल्ये, मनमोहन देसाई, उपतालुका प्रमुख जमूरत अलजी, विभागप्रमुख संजय खातू, वि. प्रमुख महेशजीं देसाई, उप विभाग प्रमुख अतिश पाटणे, संघटक संदीप रहाटे, संजय गांधी, निराधार योजनेचे अध्यक्ष विवेक शेरे, शाखा प्रमुख संजय कदम, युवा विभाग प्रमुख प्रथमेश साळवी, कुरधुंडा शाखा प्रमुख तैमूर अलजी, अमोल पाटणे, संजय शिंदे, राजेश पडये, ओंकार चव्हाण, उदय मोरे, विजय पवार, माभले सरपंच मनोहर जाधव. ओझरखोल सरपंच समीर जड्यार, कुरधुंडा सरपंच सबा अलजी, कोळंबे सरपंच रघुनाथ पडवळ, आंबेड सरपंच सुहास मायंगडे, वांद्री सरपंच दीपक किंजळे, महिला पदाधिकारी पूनम देसाई, शर्वरी वेल्ये, सुखदा शिंदे, नम्रता शेट्ये, आर्या मयेकर, गीता जाधव, मनीषा मुळ्ये, नाझिया बांगी, वेदांती पाटणे, सुप्रिया शिंदे, विशाखा टाकळे, साक्षी शिगवण, रेश्मी पाचकुडवे, ममता कानर, नेत्रा किंजळे, पूजा संसारे, मीना जाधव हि मंडळी उपस्थित होती. तसेच ग्रा. प. सदस्य, बूथ प्रमुख हि कार्य कर्ते मंडळी यांच्या जोरावर आम्ही आमच्या मतदार संघात उदय हि काळ्या दगडावरची रेघ हे निश्चितच.

आणखी वाचा