अॅल्युमिनियम प्रकल्पबाधित शेतकरी जमिनींचा ताबा घेण्यासाठी करणार शेती आंदोलन

रत्नागिरी, दि. ०४ (प्रतिनिधी) : रत्नागिरी शहरातील सुमारे १२०० एकर जमीन शासनाने BALCO या अॅल्युमिनियम प्रकल्प कंपनीकरिता १९६७ साली ४० रुपये प्रति गुंठा दराने खरेदी केली होती. परंतु सदर कंपनी प्रकल्प निजोजित जागेवर रद्द झाल्याने सुमारे १२०० एकर जमीन पडीक होती. संपूर्ण प्रोजेक्ट हा सुमारे 78 कोटीचा होता व पाचव्या पंचवार्षिक योजनेत हा कारखाना पूर्ण करण्यास सरकार पैशाची तरतूद करणार होती. हा कारखाना आला असता तर सुमारे 2 ते अडीच हजार नोकऱ्या उपलब्ध होणार होत्या. त्यावेळच्या शेतकऱ्यांनी पुढील येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करुन जमिनीतून उत्पन्न घेत असलेल्या आणि कसत असलेल्या जमिनी सरकारला कवडीमोल म्हणजे 40 रुपये प्रति गुंठा प्रमाणे दिल्या व स्वतःला आश्चत केलं की रोजगार उपलब्ध होईल, परंतु शेतकऱ्यांची निराशा झाली.

सदर जमिनी मूळ मालकांना परत देण्याची मागणी येथील प्रकल्पबाधित शेतकरी गेली ५६ वर्षे करत आहेत वारंवार आंदोलने करून देखील शासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप बाधित शेतकऱ्यांनी केला.

या जमिनी वर ताबा मिळवण्यासाठी दि. ९ जुलै रोजी येथील बाधित शेतकऱ्यांनी शेती आंदोलन करणार असल्याचे रत्नागिरी अॅल्युमिनियम प्रकल्पबाधित शेतकरी संघ, रत्नागिरीचे प्रभारी अध्यक्ष श्री राजेंद्र आयरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. या पत्रकार परिषेदेला रत्नागिरी अॅल्युमिनियम प्रकल्पबाधित शेतकरी संघ, रत्नागिरीचे पदाधिकारी उपस्तिथ होते.

आणखी वाचा