रत्नागिरी, दि. २१ (जिमाका) : जिल्हयातील सर्व असोसिएशनचे अध्यक्ष व सचिव यांची बुधवार ४ ऑक्टोबर रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सकाळी ११.३० वाजता एकविथ खेळ संघटना सभा आयोजित करण्यात आलेली आहे. या सभेस एकविथ खेळ संघटनेचे अध्यक्ष व सचिव यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी केले आहे.
सभेस उपस्थित राहताना आपल्या असोसिएशनचे संलग्नता पत्र, धर्मादाय आयुक्त नोंदणी क्रमांक पत्र, संस्थेकडील गेल्या मागील ५ वर्षातील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तर खेळाडूंचा अहवाल, आपल्या खेळाचे जिल्हयामध्ये व तालुकामध्ये सुरु असलेल्या प्रशिक्षण केंद्रांबाबतची माहिती. (प्रशिक्षकाचे नाव, मोबाईल नं, उपलब्ध जागा व खेळाडूंची संख्या) ही माहिती व अहवाल सोबत घेऊन येणे आवश्यक आहे.








