भास्कर जाधव यांच्या सुपुत्राने घेतली अजितदादांची भेट

रत्नागिरी, दि. २3 (प्रतिनिधी): कोकणातील चिपळूण येथील अजितदादांच्या दौऱ्यात ठाकरे गटाचे नेते गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांचे सुपुत्र विक्रांत जाधव हे अजित दादा पवार यांची चिपळूण येथे भेट घेतल्याने अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. विक्रांत जाधव यांचे नाव विधानसभेसाठी इच्छुक म्हणून चर्चेत आहे. राज्यात विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आल्या आहेत आणि आता अशातच विक्रांत जाधव यांनी अजितदादा पवार यांची घेतलेली भेट हा अवघ्या कोकणात चर्चेचा विषय ठरला आहे.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे माझे निवासस्थानापासून अगदी 500 मीटर अंतरावरती आले होते आणि राज्याचे एक जबाबदार मंत्री आहेत. मी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना त्यांनी मला 56 कोटी रुपयांचा निधी दिला होता तेव्हा आमचे महाविकास आघाडीचे सरकार होतं अजितदादा तेव्हाही उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री होते त्यामुळे भास्कर जाधव यांच्या शिस्तीप्रमाणे मी त्यांची भेट घेतली आहे यामध्ये कोणताही राजकीय हेतू नव्हता असे विक्रांत जाधव यांनी स्पष्ट केल आहे
मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत विक्रांत जाधव निवडणूक लढवणार का? या प्रश्नाबद्दल थेट उत्तर टाळत आता लवकरच निवडणुका आहेत तेव्हा कोण निवडणूक लढवणार किंवा नाही हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल असेही सूचक विधान विक्रांत जाधव यांनी केला आहे.
शनिवारी अजितदादा पवार यांच्या झालेल्या दौऱ्यानंतर पाठोपाठ राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार चिपळूण येथे येत आहेत. यावेळीही आपण पवारांची भेट घेणार असल्यासही विक्रांत जाधव यांनी स्पष्ट केलं आमची महाविकास आघाडी आहे आणि शरद पवार आमचे महाविकास आघाडीचे नेते आहेत असेही विक्रांत जाधव यांनी सूचित करत एकंदरच राजकीय सस्पेन्स वाढवला आहे
या सगळ्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांनी गुहागर मधून विक्रम तुझ्या उत्तर स्वतःसाठी चिपळूण विधानसभा मतदारसंघाची मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती इतकंच नाही तर यासाठी त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचं काही महिन्यांपूर्वी सांगितलं होतं मात्र शरद पवार यांनी प्रशांत यादव यांची उमेदवारी जवळपास चिपळूण विधानसभा मतदारसंघासाठी निश्चित केली आहे. त्यामुळे भास्कर जाधव यांच्या चिपळूण विधानसभा मतदारसंघ उमेदवारी ही शिवसेनेला मिळावा यासाठी सुरू असलेले प्रयत्न आता पूर्ण मिळणार की कसे हे आता पहावे लागणार आहे सोमवारच्या दोऱ्यात थोरल्या पवारांनी प्रशांत यादव यांची उमेदवारी जाहीर केल्यास महाविकास आघाडीतून ही जागा राष्ट्रवादीला सोडल्याचे स्पष्ट होईल मात्र उमेदवारी जाहीर न केल्यास चिपळूण विधानसभा मतदारसंघातील सस्पेन्स वाढणार आहे

आणखी वाचा