पाली /बेणसे दि. 13 (धम्मशील सावंत) : पुरस्काराने प्रेरणा मिळते आणि प्रेरणेने राष्ट्र घडते,असे बलशाली, संस्कारक्षम आणि समृद्ध राष्ट्र घडविण्यासाठी माँसाहेब जिजाऊंच्या विचाराने प्रेरित होऊन समाज आणि राष्ट्र हितासाठी परिपूर्ण योगदान देणार असल्याचे प्रतिपादन समाजसेविका सौ.माधवी ताई जोशी यांनी केले. सामाजिक , सांस्कृतिक,राजकीय, उद्योग, सेवाभावी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत आपल्या कार्यकर्तृत्वाचा प्रभाव आणि आगळा वेगळा ठसा उमटविणाऱ्या समाजसेविका सौ. माधवीताई जोशी यांना पाचाड रायगडच्या पुण्यभूमीत ताराराणी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष शिवमती वंदनाताई मोरे आणि अन्य पदाधिकारी यांच्या उपस्थितीत माँसाहेब जिजाऊंच्या नावे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याचवेळी अन्य महिला भगिनींचा देखील यथोचित सन्मान करण्यात आला.
जागतिक कीर्तीचे बुद्धिवंत आणि महापराक्रमी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना घडविणाऱ्या माँसाहेब जिजाऊ यांच्या जयंती निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील ताराराणी ब्रिगेड महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने समाजातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तुत्ववान महिलांचा जिजाऊ पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. यावर्षीही सन्मान सोहळा घेण्यात आला. समाजात निस्वार्थी आणि प्रामाणिक हेतूने अनेकजण सामाजिक कार्य करीत असतात. समाजातील दुर्बल घटकाला सक्षम आणि सधन करण्याचे काम माधवी ताई जोशी आपल्या योगदानातून करीत आहेत. त्यांच्या सेवाभावी कार्याची दखल ताराराणी ब्रिगेड ने घेतली असून त्यांना पुरस्कार देऊन पुढे अधिक जोमाने काम करण्यास प्रेरणा आणि प्रोत्साहन दिले आहे. 400 वर्षापूर्वी माँसाहेब जिजाऊंनी जुन्या चालीरीती, परंपरा, अंधश्रद्धा, जातीयवादी प्रवृत्तीला मूठमाती दिली. त्यावेळी समाजाची गरज ओळखून आपल्या रयतेला जुलमातून मुक्त करण्यासाठी स्वराज्य स्थापनेचा संकल्प केला. आणि पूर्णत्वास नेला. त्याच जिजाऊंचे स्मरण करत आजच्या युगातील समाजाच्या गरजा ओळखून समाजाप्रती आपले कर्तव्य समजून आपल्या कामाच्या , सेवेच्या माध्यमातून योगदान देणाऱ्या माधवीताई जोशी यांना जिजाऊ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. माझ्या कार्याची दखल ताराराणी ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेने घेतली ,
माँसाहेब जिजाऊंच्या नावे मिळणारा पुरस्कार माझ्यासाठी जीवनातील सर्वोच्च पुरस्कार असून आता सामाजिक दायित्वाची अधिक जबाबदारी वाढली आहे , यापुढेही माझ्या हातून समाजसेवेचे अधिकअधि
क काम घडेल असे शेवटी माधवीताई जोशी यांनी सांगितले.
क काम घडेल असे शेवटी माधवीताई जोशी यांनी सांगितले.







