महाराष्ट्रातील शिववैभव संपूर्ण जगातील कानाकोपऱ्यात गेलेच पाहिजे.त्याच अनुषंगाने १२ गडकिल्ले युनेस्कोकडे नामांकनासाठी सरकारने पाठविले आहेत.यामुळे महाराष्ट्राचाच नाही तर संपूर्ण भारताचा गौरव वाढेल व संपूर्ण जगात शिवाजी महाराजांची गौरवगाथा आपल्याला दिसुन येईल.या किल्ल्यांना असलेले शौर्य,पराक्रम, रयतेच्या कल्याणाचा वारसा आणि ऐतिहासिक महत्वकांशा भारतासह जगभरात पहायला मिळेल. महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ला असे १२ गड किल्ल्यांना म्हणजेच मराठा मिलिटरी लॅंडस्केप्स ऑफ इंडियाला जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठी भारत सरकारने युनेस्कोकडे प्रस्ताव सादर केला आहे.केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने २०२४-२०२५ या वर्षासाठी शिवरायांच्या या गडकिल्ल्यांना नामांकन देण्याचा प्रस्ताव पाठविला आहे.यामुळे महाराष्ट्रातील व तामिळनाडूतील जिंजी किल्ला आंतरराष्ट्रीय पातळीवर गणल्या जाईल व पर्यटनाला चालना मिळण्यास मोठी मदत होईल.परंतु एकट्या महाराष्ट्रात शिवकालीन ३९० हुन अधिक गडकिल्ले आहेत.त्यांचाही युद्धपातळीवर विकास व्हायला पाहिजे यापध्दतीने सरकारने पाऊल उचलले पाहिजे.कारण यामुळे शिवकालीन वास्तु टिकण्यास मोठी मदत होईलच सोबत राज्यासह देशातील प्रत्येक व्यक्ती शिवकालीन लहान-मोठे गडकिल्ले पहाने पसंत करेल व इतिहास पुन्हा-पुन्हा जागृत होईल.आज भारत जगात तिसरी महाशक्ती म्हणून उदयास येत आहे.त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने व ऐतिहासिक वास्तू जोपासण्यासाठी संपूर्ण लहान-मोठ्या गड किल्ल्यांना सरकारने प्राधान्य द्यायला हवे.कारण राज्यातील अनेक गडकिल्ले जिर्नाअवस्थेत आहे.परंतु शिवरायांच्या आठवणी जागृत ठेवण्यासाठी त्याचा जिर्णोद्धार होणे गरजेचे आहे. युनेस्कोकडे पाठविलेल्या प्रस्तावामध्ये महाराष्ट्रातील साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग या ११ आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ल्यांचा समावेश आहे ही महाराष्ट्रवासीयांसाठी आणि भारतासाठी स्वागतार्ह व गौरवास्पद बाब आहे.आपण गडकिल्ल्यांकडे पाहाले व त्याचा निरखून अभ्यास केला तर आपल्याला त्या किल्ल्याची बनावट व शौर्यगाथा,पराक्रम पाहून मन भारावून जाते अशा पध्दतीची गडकिल्ल्यांची बनावट व जोपासना त्याकाळी कशीकाय केली असावी हे एक आश्चर्यच म्हणावे लागेल.महत्वाचे म्हणजे ज्या १२ किल्याचा युनेस्कोकडे नामांकनासाठी प्रस्ताव पाठविला आहे ते गडकिल्ले मराठा राजवटीत शत्रूशी झुंज देण्यासाठी लष्करी तळासाठी वापर केला जात असे.त्या किल्ल्यांना आता युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात स्थान मिळण्यासाठी भारताकडून नामांकनाचा प्रस्ताव सादर केला आहे.कारण १७ व्या शतकापासून तर १८१८ पर्यंत पेशवे राजवटीत असलेले किल्ले सांस्कृतिक आणि नैसर्गिक अशा दोन श्रेणींमध्ये विभागले गेले आहे.मराठा शासन काळात या किल्ल्यांचा वापर करून अतुलनीय पराक्रम गाजविला होता.सह्यांद्री, कोकण किनारपट्टी आणि दख्खनच्या पठारावर असलेल्या या किल्ल्यांचे भौगोलिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचे नामांकन सांस्कृतिक आणि नैसर्गिक अशा दोन श्रेणीत होत असते आणि या दोन्ही श्रेणी १२ गडकिल्ल्यांमध्ये आजही शाबूत आहे.त्यामुळे भारताच्या १२ ही गडकिल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश अवश्य होईल असा माझा ठाम विश्वास आहे.यामुळे भारताची वैभवगाथा जगप्रसिद्ध होईल व जागतिक पर्यटन स्थळे म्हणून जगातील पर्यटक किल्ल्यांना भेट देतील यामुळे भारत आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल.१२ गडकिल्ले जागतिक स्तरावर यावे यासाठी युनेस्कोकडे नामांकन केले हे तर खुपच छान आणि स्वागतार्ह आहे.परंतु महाराष्ट्रासह भारतीयांसाठी महाराष्ट्रातील लहान-मोठे ३९० हुन अधिक गडकिल्ले आहेत ते सुशोभित करण्याकडे सरकारने जातीने लक्ष देण्याची गरज आहे.यामुळे महाराष्ट्राला आर्थिक बळ मिळेल व राज्याचा विकास भरभराटीला येईल.
लेखक
रमेश कृष्णराव लांजेवार
(माजी विद्यापीठ प्रतिनिधी, नागपूर)
मो.नं.९९२१६९०७७९, नागपूर.
१२ गड किल्ल्यांचा युनेस्कोकडे नामांकनाचा प्रस्ताव स्वागतार्ह; सोबतच सरकारने राज्यातील लहान-मोठे ३९० गडकिल्ले सुशोभित करण्यास प्रथम प्राधान्य द्यावे








