हनुमान जयंतीनिमित्त शालेय स्पर्धेत नाखरे शाळेचे यश

रत्नागिरी (पावस), दि. ०४ : हनुमान जन्मोत्सव सोहळा 2026 निमित्त श्री हनुमान सेवा व महिला मंडळ, गावडे आंबेरे हनुमानवाडी (खारवीवाडा) यांच्या वतीने पावस पंचक्रोशी मर्यादित विविध शालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा नाखरे नं. १ ने उल्लेखनीय यश संपादन केले.

या स्पर्धेत सिया वाळिंबे, योगिनी शिंदे, क्षितिजा सोमेस्कर, अस्मि धुळप, संस्कृती पावसकर, संस्कार कुळये, तिर्था कुळये व दुर्वा धुळप यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांना स्पर्धा प्रमुख पदवीधर शिक्षक सुहास वाडेकर, मुख्याध्यापक राजेंद्र भिंगार्डे, श्रावणी केळकर, अंगणवाडी सेविका मंगला चव्हाण, मदतनीस योगिता शिंदे व अपेक्षा नार्वेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे :
पाढे पाठांतर स्पर्धेत दुर्वा सुधीर धुळप (इयत्ता ६ वी) हिने द्वितीय क्रमांक मिळवत सन्मानचिन्ह, रोख रक्कम व प्रशस्तीपत्र पटकावले. हस्ताक्षर व रंगभरण स्पर्धेत तिर्था धर्मेंद्र कुळये (इयत्ता ६ वी) हिने उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक मिळवत शैक्षणिक साहित्य प्राप्त केले. वक्तृत्व स्पर्धेत संस्कार धर्मेंद्र कुळये (इयत्ता ५ वी) याने उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक मिळवला.

या यशाबद्दल पारितोषिक विजेते, सहभागी विद्यार्थी, पालकवर्ग व मार्गदर्शक शिक्षकवृंद यांचे शाळा व्यवस्थापन अध्यक्ष रामदास लांजेकर, उपसरपंच विजय चव्हाण, सरपंच विद्या जाधव, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य नामदेव कोकरे, जि. प. सदस्य महेंद्र मांडवकर, शिक्षण सभापती नंदा मुरकर, केंद्रप्रमुख रिहाना म्हसकर, विस्तार अधिकारी भाग्यश्री हिरवे, गटशिक्षणाधिकारी वैभव डुबल तसेच ग्रामस्थ व शिक्षणप्रेमी यांनी अभिनंदन केले आहे.

आणखी वाचा