रत्नागिरी जिल्ह्यात आज होणार १ लाख ६६ हजार ९८६ घरगुती, तर ११६ सार्वजनिक गणपतींची प्रतिष्ठापना

रत्नागिरी, दि. १८ (प्रतिनिधी): कोकणातील सर्वात महत्वाचा समजला जाणाऱ्या गणोशोत्सवाची जय्यत तयारी प्रत्येक घराघरात सुरु आहे. बाजारपेठा सजल्या आहेत. चाकरमानी जिल्ह्यात दाखल झाले आहे.

मंगळवारी प्रत्येक घरी बाप्पाचे वाजात गाजत आगमन होणार असून जिल्ह्यात १६६९८६ घरगुती तर ११६ सार्वजनिक मंडळांमार्फत बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. गणेशोत्सवासाठी प्रशासनासह पोलीस दलही सज्ज झाले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये १ लाख ६६ हजार ९८६ घरगुती गणपती, तर ११६ सार्वजनिक गणेशोत्सावाची प्रतिष्ठापना होणार आहे. त्यामधील ११ हजार ९८४ दीड दीवसांचे गणपती आहेत. घरच्या गणपती बाप्पासाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या विविध भागांतून चाकरमानी गावी येतात.

आणखी वाचा