अमेरिकेत पुन्हा trump सरकार!

नवी दिल्ली, दि. ०६ (पीएसआय वृत्तसंस्था): अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षीय निवडणुकांचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत, आणि डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनणार आहेत, अशी माहिती फॉक्स न्यूजने दिली आहे. यावेळी रिपब्लिकन पक्षाने मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली असून, डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ट्रम्प यांच्या या विजयाने जागतिक स्तरावर चर्चेचा विषय निर्माण केला आहे.

दरम्यान संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार, माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार, माजी उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये ही लढत अत्यंत चुरशीची झाली.

अमेरिकन निवडणुकीमध्ये अध्यक्षीय मतदारांची संख्या ही 538 आहे. विजयासाठी उमेदवाराला 270 चे मॅजिक फिगर गाठावे लागते. रिपब्लिक पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना 277 अध्यक्षीय मते मिळाली तर डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार, माजी उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांना 226 मतांवर समाधान मानवे लागले.

ट्रम्पची विजयाची रणनीती-
या निवडणुकांमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका सात स्विंग स्टेट्सने निभावली. या राज्यांमध्ये दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी आपली संपूर्ण ताकद लावली होती, मात्र शेवटी ट्रम्प यांना या राज्यांमध्ये आघाडी मिळाली. विशेषत: दोन राज्यांमध्ये त्यांनी निर्णायक विजय मिळवला आहे. अमेरिकेतील या कठीण निवडणुकीत ५३८ इलेक्टोरल कॉलेज मतांमधून २७० पेक्षा अधिक मतांची गरज असते, जी बहुमताचा आकडा पार करण्यासाठी अत्यावश्यक असते.
अमेरिकेत होणाऱ्या या अध्यक्षीय निवडणुकीची भारतातही जोरदार चर्चा आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील मैत्री कोणापासून लपलेली नाही. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ झाले होते. पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील मैत्री अनेक प्रसंगी जगजाहीर झाली आहे. भारतीयांकडून ट्रम्प यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

कशी होते राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक?

अध्यक्षपदासाठी 5 नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार असली तरी ती निवडणूक अध्यक्षाच्या निवडणुकीत प्रत्यक्ष मतदान करणाऱ्या मतदारांची निवडणूक आहे. अध्यक्षाच्या निवडणुकीत मतदान करणारा एक विशिष्ट मतदार वर्ग असतो. त्यालाच निर्वाचकगण- इलेक्टोरल कॉलेज म्हटले जाते. अर्थातच सामान्य मतदार अध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये सरळ मतदान करीत नाही. तो अध्यक्षाची नाही, तर अध्यक्षीय मतदारांची निवड करतो. तेथील अध्यक्षीय मतदारांची संख्या राज्यनिहाय निराळी आहे. अमेरिकेतील एकूण 50 राज्यातील अध्यक्षीय मतदारांची संख्या 535 आहे. परंतु अध्यक्षीय मतदारांची – निर्वाचकगणाची एकूण संख्या 538 आहे. त्यासाठी 23 वी घटनादुरुस्ती महत्त्वाची ठरली आहे. या दुरुस्तीला अनुसरून राष्ट्रीय राजधानी असलेल्या वाशिंग्टन, डी. सी. (डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया) साठी तीन अध्यक्षीय मतदार देण्यात आले आहेत. अर्थातच ही संख्या लहान राज्याच्या अध्यक्षीय मतदाराइतकी आहे. लहान राज्याची लोकसंख्या कितीही असली तरी त्यांची अध्यक्षीय मतदारांची संख्या तीन असते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर दिल्या शुभेच्छा…

“तुमच्या ऐतिहासिक निवडणुकीतील विजयाबद्दल माझ मित्र डोनाल्ड ट्रम्प यांचे मनापासून अभिनंदन. तुम्ही तुमच्या मागील कार्यकाळात चांगली कामगिरी केलीत. भारत-अमेरिका व्यापक जागतिक आणि धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी मी उत्सुक आहे. आपल्या लोकांच्या भल्यासाठी आणि जागतिक शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी एकत्रितपणे काम करूया”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Heartiest congratulations my friend @realDonaldTrump on your historic election victory. As you build on the successes of your previous term, I look forward to renewing our collaboration to further strengthen the India-US Comprehensive Global and Strategic Partnership. Together,… pic.twitter.com/u5hKPeJ3SY

— Narendra Modi (@narendramodi) November 6, 2024

आणखी वाचा