रत्नागिरी, दि. ११ (प्रतिनिधी): राजापूर तालुक्यातील आडिवरे – वाडापेठ वाडीखुर्द येथील सचिन कुलकर्णी यांच्या निवासस्थानी कालिका देवीच्या पालखीचे आगमन झाले असता राजापूर – लांजा – साखरपा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन प्रभाकर साळवी यांनी त्यांच्या घरी भेट देत कालिकादेवीचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी शिवसेना नेते संजय साळवी, प्रकाश डुकळे, श्री पाध्ये यांच्यासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी कुलकर्णी परिवार आणि ग्रामस्थांच्या वतीने आमदार राजन साळवी यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि गावातील या धार्मिक कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली.