दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार

रत्नागिरी, दि. ०७ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार, याकडे डोळे लावून बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल उद्या, मंगळवार ८ मे रोजी दुपारी ठीक १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. मंडळाचे सचिव दीपक माळी यांनी यासंदर्भात अधिकृत घोषणा केली आहे.

नऊ विभागीय मंडळांचा निकाल एकाच वेळी

राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावीची परीक्षा पार पडली होती. या सर्व मंडळांचा निकाल उद्या एकाच वेळी संकेतस्थळावर उपलब्ध होईल. गेल्या आठवड्यात २ मे रोजी बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीच्या निकालाबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती.

निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ

विद्यार्थ्यांना उद्या दुपारी १ वाजल्यापासून मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर आपला निकाल विषयनिहाय गुणांसह पाहता येईल. तसेच, निकालाची मूळ प्रत (प्रोव्हिजनल मार्कशीट) डाऊनलोड करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वीच्या परीक्षेचा निकाल पुढील अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाईन जाहीर करण्यात येईल.

1) https://results.digilocker.gov.in
2) https://mahahsscboard.in
3) https://sscresult.mkcl.org
4) https://results.targetpublications.org
5) https://results.navneet.com
6) https://www.tv9marathi.com
7) https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc-10-results

परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवर उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. त्याचप्रमाणे Digilocker App मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच https://mahahsscboard.in (in school login) या संकेतस्थळावर शाळांना त्यांच्या शाळांचा एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ https://mahahsscboard.in वरून स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या असल्याचे मंडळामार्फत कळविण्यात आले आहे.

गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनाबाबत महत्त्वाची माहिती

ज्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांबाबत शंका आहे किंवा ज्यांना उत्तरपत्रिकेची छायाप्रत हवी आहे, त्यांच्यासाठी मंडळाने खालीलप्रमाणे वेळापत्रक जाहीर केले आहे:

  • ऑनलाईन अर्ज कालावधी: ९ मे ते २३ मे २०२६.

  • पुनर्मूल्यांकन अट: पुनर्मूल्यांकनासाठी आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे.

  • अर्ज प्रक्रिया: छायाप्रत मिळाल्यानंतर पाच दिवसांच्या आत विहित शुल्कासह विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल.

How to Check SSC Result 2026 Maharashtra Board Online?

The process to download maharashtra ssc result 2026 is given below.

  • Visit Board’s website- mahahsscboard.in and sscresult.mahahsscboard.in
  • Click on ssc result 2026 maharashtra board link
  • Enter roll number and mother’s first name
  • SSC 10th result 2026 maharashtra board will be displayed on screen
  • Download and save it

आणखी वाचा