कोकणात १३ बांगलादेशींची अवैधरित्या घुसखोरी

रत्नागिरी, दि. १२ (प्रतिनिधी): तालुक्यातील नाखरे-कालरकोंडवाडी येथील चिरेखाणीवर अवैधरित्या वास्तव्य करणार्‍या 13 बांगलादेशी घुसखोरांना दहशतवाद विरोधी पथकाने आज (मंगळवार) पहाटे 3.40 वाजता अटक केली.

वहिद रियाज सरदार (वय 35), रिजाउल हुसेन करीकर (50), शरिफूल हौजीआर सरदार(28), फारुख महंमद जहीरअली मुल्ला (50), हमिद मुस्तफा मुल्ला (45), राजु अहमद हजरतली शेख (31), बाकिबिल्लाह अमीर हुसेन सरदार (39), सैदूर रेहमान मोबारक अली (34) आलमगिर हूसेन हिरा सन ऑफ अब्दुल कादर दलाल (34), मोहम्मद शाहेन सरदार सन ऑफ समद सरदार (32), मोहम्मद नुरुझमान मोरोल सन ऑफ बलायत अली (38), मोहम्मद नुरहसन सरदार सन ऑफ मोहम्मद जहर सरदार(45) आणि मोहम्मद लालूट मोंडल सन ऑफ किताब अली (37 सर्व रा.ढाका,बांगलादेश) अशी अटक करण्यात आलेल्या तेरा जणांची नावे आहेत.

त्यांच्या विरोधात दहशतवाद विरोधी शाखेचे पोलिस नाईक रत्नकांत शिंदे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित 13 बांग्लादेशी घुसखोर जून 2024 पासून अद्यापपर्यंत वैध कागदपत्रांशिवाय तसेच भारत-बांगलादेश सिमेवरील मुलखी अधिकार्‍याच्या लेखी परवानगीशिवाय भारतात अवैधरित्या प्रवेश करुन आसिफ सावकार (रा.पावस बाजारपेठ, रत्नागिरी) याच्या नाखरे ग्रामपंचायत हद्दीतील कालरकोंड वाडी येथील चिरेखाणीवर वास्तव्य करताना मिळून आले. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास पूर्णगड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रत्नदिप साळोखे करत आहेत.

बांग्लादेशी नागरिक असताना देखील कोणत्याही वैध कागदपत्राशिवाय तसेच भारत- बांग्लादेश सिमेवरील मुलखी अधिकाऱ्याच्या लेखी परवानगीशिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात अवैधरित्या प्रवेश करून राहत असल्याचे स्पष्ट झाला आहे. या सगळ्यांना ताब्यात घेऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे मात्र या कारवाई यांनी जिल्ह्यात बांगलादेशी नागरिकांच्या घुसखोरीचा विषय पुन्हा एकदा समोर आला आहे. या सगळ्या पकडायची चौकशी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक  जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. ही नागरिक कुठून आले यांना कोणी बोलावले यामागचे संदर्भ काय कोणाच्या ओळखीतून ते राजापूर मध्ये आले?या सगळ्याचा तपास सुरू आहे.

आणखी वाचा