लोकशाही व संविधान मान्य नसणाऱ्या भाजपाकडून व्होट जिहादचा नारा देऊन मतदारांचा अपमान : नाना पटोले

मतदान करताना सोयाबीनकापसाच्या भावाची आठवण ठेवामविआचे सरकार आल्यानंतर हमीभावापेक्षा जास्त भाव देऊ

मुंबई/ यवतमाळ दि. १३ नोव्हेंबर २०२४ : भाजपाचे नेते बटेंगे तो कटेंगेएक हैं तो सेफ हैव्होट जिहाद यासारख्या घोषणा देऊन छत्रपती शिवाजी महाराजशाहूफुलेआंबेडकरांच्या महाराष्ट्रात धर्माच्या आधारावर फूट पाडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीअमित शाह महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत आणि याच महायुतीच्या उमेदवारांमध्ये नवाब मलिकही उमेदवार आहेतज्यांच्यावर भाजपाने दाऊदशी संबंध असल्याचे आरोप करुन जेलमध्ये टाकले होते. सत्तेसाठी उद्या भाजपा कुख्यात माफिया दाऊदला निवडणुकीत उभे करेल तर त्याला काय सत्ता जिहाद म्हणायचे काअसा संतप्त सवाल विचारून लोकशाही व संविधान मान्य नसणारा भाजपा ‘व्होट जिहाद’चा नारा देऊन मतदारांचा अपमान करत आहेअसा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आर्णी केळापूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस मविआचे उमेदवार जितेंद्र मोघे यांच्या प्रचारासाठी घाटंजी येथे सभा घेतली. या सभेला अखिल भारतीय आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी मंत्री शिवाजीराव मोघे अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्जायवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रफुल मानकरख्वाजा बेगप्रवीण देशमुखभरतभाऊ राठोडगणेश मुत्तेमवारसतीश भोयारशंकरराव ठाकरेमनिष डागले यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारीकार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी नाना पटोले पुढे म्हणाले कीकेंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करुशेतमालाला हमीभाव देऊ अशी आश्वासने देऊन भाजपाने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. सोयाबीनचा हमीभाव ४ हजार ८९२ रुपये आहे पण बाजारात ३००० ते ३५०० रुपये क्विंटल दराने विकला जात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सोयाबिनला ६,००० रुपये भाव देण्याचे आश्वासन दिले होते. कापसालाही हमीभावापेक्षा कमी भाव मिळत आहेतया भावात शेतकऱ्यांच्या लागवडीचा खर्चही निघत नाही. भाजपाच्या सुलतानी सरकारने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत मतदान करताना सोयाबीन व कापसाच्या भावाची आठवण करा व मगच मतदान करा. मविआचे सरकार आल्यानंतर सोयाबीनकापसाला हमीभावापेक्षा जास्त भाव देऊअसे आश्वासनही नाना पटोले यांनी दिले आहे.

आणखी वाचा