रिफायनरी नको असेल तर जबरदस्ती करणार नाही; महायुती उमेदवार राजेश बेंडल यांच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

गुहागर, दि. १६ (प्रतिनिधी): माझ्या लाडक्या बहिणींनो डिसेंबरचा हफ्ता लवकरच खात्यामध्ये जमा होणार आहे. हे सरकार माझ्या लाडक्या बहिणीला लखपती करणारे सरकार कार आहे. हे माझ्या लाडक्या बहिणीच्या खात्यात हफ्ते भरणारे सरकार आहे. असे सांगतानाच स्थानिकांना रिफायनरी नको असेल तर आमचे सरकार जबरदस्ती करणार नाही. आम्ही सामान्य लोकांवरती जोर जबरदस्ती करणार नाही, असे प्रतिपादन करतानाच महायुतीचे गुहागर मधील उमेदवार राजेश बेंडल यांना विजयी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
कोकणच्या विकासाचा अनुशेष मी भरून काढणार असून कोकणातील पर्यटन वृद्धीसाठी प्रयत्न करणार आहे. तुम्ही मला साथ या केंद्रात आमची सत्ता आहेच. महाराष्ट्रातही सत्ता येणार व कोकणचा कायापालट करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंद यांनी येथे बोलताना दिली. गुहागरमधील महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल यांच्या श्रृंगारतळी येथील सभेमध्ये ते बोलत होते.
निरामय हॉस्पिटलसाठी उदयजी २० कोटी द्या आणि रुग्णालय सुरू करा निरामय हॉस्पिटलला लागणारे सुमारे २० कोटी रुपये उद्योगमंत्री उदय सामंत तुम्ही द्या व लवकरच हॉस्पिटल चालू करा, असेही ते म्हणाले. आज शामराव पेजे यांचा स्मृतिदिन आहे त्यांनाही मी वंदन करतो, असेही ते म्हणाले.
माझ्या लाडक्या बहिणींनो डिसेंबरचा हफ्ता लवकरच खात्यामध्ये जमा होणार आहे. हे सरकार माझ्या लाडक्या बहिणीला लखपती करणारे सरकार आहे. हे माझ्या लाडक्या बहिणीच्या खात्यात हफ्ते भरणारे सरकार आहे. स्थानिकांना रिफायनरी नको असेल तर आमचे सरकार जबरदस्ती करणार नाही. आम्ही सामान्य लोकांवरती जोर जबरदस्ती करणार नाही
समृद्धी महामार्गावरून १५ ते १८ तास वाहतुकीला लागत होते. आता सहा तासात नागपूरचा माणूस मुंबईमध्ये पोहोचतो. आता मुंबई ते सिंधुदुर्ग सुपर फास्ट करुया असेही ते म्हणाले ज्यांनी लाडकी बहिण योजना केली त्यांची चौकशी करा व जेलमध्ये टाका असे विरोधक म्हणत होते. मात्र तुमच्या पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही. तुम्ही कोणाला धमक्या देता. माझ्या बहिणींनी तुमचा सत्तेत येण्याचा मार्ग बंद केला आहे. सत्तेत येण्याचा विचार सोडून टाका, माझ्या लाडक्या बहिणीची योजना, भावांची योजना व इतर योजनामुळे मला जेलमध्ये जावे लागले तर माझ्या बहिणींसाठी एकदा नाहीतर हजारदा जेलमध्ये जाईन.
गुहागर मतदार संघामध्ये भाकरी फिरवण्याची वेळ गुहागर मतदार संघामध्ये भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे. सध्या ती करपली आहे. भगवान पर्शुरामाच्या पौराणिक भूमीवर येथील उमेदवार राजेश बेंडल यांच्या प्रचारासाठी आलो आहे. अगदी साधा माणूस आहे छक्के पंजेगिरी काही नाही. त्याला मी पहिल्यांदा पहिले तेव्हा समजलो कि हा योग्य उमेदवार आहे. आता दुर्जनांच्या माथी हाणू काठी आणि सज्जनांच्या हाती देवू धनुष्यबाण आणि भगव्या झेंड्याची काठी. राजेश बेंडल निवडून विधानसभेत जाणार… असा कौल व्याडेश्वर व दुगदिवीने दिला आहे. आता महायुतीचे सरकार आहे. यापुढेही महायुतीचे सरकार १०० टक्के येणार, असेही ते म्हणाले.
या सभेला पालकमंत्री उदय सामंत, माजी आमदार विनय नातू, चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, तालुकाप्रमुख बाबू कनगुटकर, भाजपा तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, विश्वनाथ पाटील, प्रदीप बेंडल, सुरेश सावंत, नीलम गोंधळी, बावा भालेकर, अमरदीप परचुरे, संतोष आग्रे, प्रल्हाद विचारे यांसह अनेक प्रमुख मंडळी उपस्थित होती.

आणखी वाचा