संगमेश्वर, दि. २१ (प्रतिनिधी): मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर- कसबा नजीक ग्रामीण रुग्णालय आणि त्याच इमारतीसमोर ट्रामा केअर सेंटर उभारण्यात आलेले आहे. संगमेश्वर परिसरातील सुमारे ९५ गावातील सर्वसामान्य ग्रामस्थांना या संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयाचा महत्त्वाचा आधार आहे तर आरवली ते बावनदी या ४० किलोमीटरच्या अपघातप्रवण क्षेत्रात अपघातग्रस्तांवर तातडीचे ‘उपचार व्हावेत, याकरिता या अत्याधुनिक ट्रामा केअर सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, गेली अनेक वर्षे या ड्रामा केअर सेंटरमधील महत्त्वाची पदे रिक्त आहेत.
संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयासह महत्त्वाच्या ट्रामा केअर सेंटरमध्ये अत्यावश्यक असलेली डॉक्टरांचीच अनेक पदे रिक्त असल्याने अन्य कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडत आहे.








