सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय सामाजिक संस्था, रत्नागिरी यांच्या वतीने ‘संविधान दिन’ संपन्न

रत्नागिरी, दि. २९ (प्रतिनिधी): गुरुवर्य अ .आ.देसाई माध्यमिक विद्यामंदिर हातखंबा या ठिकाणी २६ नोव्हेंबर या दिनी ७५ वा संविधान दिन प्रा.धोगडे सर यांच्या अध्यक्षतेखाली सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय सामाजिक संस्था, रत्नागिरी यांच्या वतीने पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आणि भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून करण्यात आली. तसेच २६/११ रोजी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
व्याख्याता मा . कु .सेजल तांबे यांचे ‘भारतीय संविधान आणि सद्यस्थिती ‘या विषयावर व्याख्यान झाले. “भारतीय नागरिकांना मिळणारे सर्व हक्क फक्त भारतीय संविधानामुळेच मिळाले आहेत” असे प्रतिपादन करून संविधान निर्मितीची प्रक्रिया ,संविधानातील मूलभूत हक्क आणि आजची परिस्थिती यावर भाष्य केले .कार्यक्रमाचे अध्यक्ष धोगडे सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधान निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये कसा सिंहाचा वाटा आहे आणि त्यांना संविधानाचे शिल्पकार का म्हटले जाते याचे विवेचन केले तसेच संस्थेचे अध्यक्ष चंद्रमणी सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेच्या उपाध्यक्ष तेजस्विनी कांबळे यांनी केले तर प्रास्ताविक संस्थेचे सचिव अमर पवार यांनी केले. आभार प्रदर्शन माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षिका मधाळे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाला शिरतोडे सर आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी त्याचबरोबर संस्थेचे सहकारी भाग्यश्री पावरा, इशिषा जाधव, पायल कांबळे उपस्थित होत्या

आणखी वाचा