महायुती सरकारचा ५ डिसेंबरला शपथविधी सोहळा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार

रत्नागिरी, दि. ०१ (प्रतिनिधी):  राज्यात महायुतीचे सरकार स्थापन करण्याचा मुहूर्त अखेर ठरला आहे. दि. 5 डिसेंबर 2024 रोजी सरकारचा शपथग्रहण सोहळा होणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली.
राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून सात दिवसांनी अखेर नवे सरकार कधी स्थापन होणार याची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील महायुतीचे सरकार येत्या ५ डिसेंबर रोजी शपथ घेणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडियाद्वारे दिली. महायुतीचा शपथविधी सोहळा ५ तारखेला आझाद मैदानात संध्याकाळी ५ वाजता होणार आहे. या शवथविधी सोहळ्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याचे श्री. बावनकुळे यांनी सांगितले.
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालात २८८ पैकी महायुतीला २३५ जागा मिळाल्या आहेत. भाजपने सर्वाधिक १३२ जागांवर विजय मिळवला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने ५७ तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ४१ जागांवर बाजी मारली होती.
शिवसेना नेते आमदार उदय सामंत म्हणाले, सत्ता स्थापन होण्यामध्ये कोणाचाही कुठचाही मार्गाचा अडसर नाही आणि हे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीमधूनही जाहीर केले होते त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांमध्ये सत्ता स्थापन होण्यामध्ये कोणते हरकत नाही पण यातली एक महत्त्वाची तांत्रिक बाब लक्षात घेतली पाहिजे की, भाजपाच्या गटनेता निवडीची विधिमंडळाच्या आमदारांची बैठक अजून व्हायची आहे त्यांचे निरीक्षक घेणार आहेत त्यानंतर गटनेता नेमल्यानंतर तात्काळ दोन-तीन दिवसात मंत्रिमंडळ स्थापन केले जाईल अशी माहिती शिवसेना नेते उदय सामंत यांनी दिली आहे.
शिंदे साहेब मोठ्या पदावर राहावेत ही आमची इच्छा
राज्याचे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी सरकारच्या प्रोसेस मध्ये राहावं सरकारमध्ये मोठ्या पदावर असावेत अशी आमची सगळ्यांची इच्छा आणि आम्ही ही सगळ्या सहकाऱ्यांनी त्यांच्याजवळ बोलून दाखवली आहे. सगळ्या निर्णयाचे अधिकार आम्ही त्यांना दिले आहेत आमच्या मागणीला मुख्यमंत्री मान देतील असा विश्वास व्यक्त करत शिवसेनेचे उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये मोठ्या पदावर राहतील असे सूतोवाच सामंत यांनी केला आहे.
निकालामुळे आघाडीचे नेते सैरभैर झालेत
निवडणुकीत पैशाचा वापर झाला व ईव्हीएम यंत्राबाबत महाविकास आघाडीचे नेते शरद पवार,उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेतले आहेत. बावीस आमदारांनी पुन्हा मतमोजणी करण्यासाठी फी भरली आहे. यावर शिवसेना नेते उदय सामंत यांनी भूमिका मांडली आहे.
ईव्हीएम मतदान यंत्राची तपासणी करावी लंडन अमेरिकेतून शास्त्रज्ञाना तुमच्यातून कोणी शास्त्रज्ञ झाले असतील तर त्यांना तपासायला सांगा आम्हाला कसली भीती नाही असं सांगत पैशाचा वापर झाल्यावर म्हणून कोण सांगत असेल तर हा मतदारांवर आक्षेप आहे लोकशाहीतला हा फार मोठा आक्षेप आहे. मतदारांवर आपण आक्षेप घेतो आहोत याची देखील जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे पण जो निकाल लागला आहे त्यामुळे सगळे सैरभर झाले आहेत त्यामुळे एक कलमी कार्यक्रम महायुती
च्या नेत्यांना व सहकार्यांना बदनाम करणं एवढाच उरला आहे आहे असाही टोला सामंत यांनी आघाडीच्या नेत्यांना लगावला आहे.
सामंत पुढे म्हणाले की, आम्ही जर घाबरतच नाही ना आम्ही जर घाबरलो असतो तर ते जे म्हणतात की आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला मॅनेज केलं तर मग त्यांनी जे 45 हजार रुपये भरले जातात की रँडमली ईव्हीएम चेक करण्यासाठी यावर आम्ही आक्षेप घेतला असता पण आम्ही म्हणतो तपासात आणि काय कोठून एक्सपर्ट आणायचे असतील तर आणा असही थेट आव्हान उदय सामंत यांनी दिले. निवडणूक आयोगाने तीन तारखेला विरोधकांना चर्चेला बोलावलं आहे यावर सामंत म्हणाले की नांदेड येथे काँग्रेसची खासदारकीची जागा निवडून आली त्यावर कोणाचा आक्षेप नाही आमची जिथे निवडून आलो तिथे ईव्हीएम वर आक्षेप आहे त्यामुळे ईव्हीएम वर अक्षय ज्यांचा ज्यांचा त्यावर निवडणूक आयोग नक्की खुलासा करणार असेल म्हणून त्यांना चर्चेला बोलावलं असेल असं मत सामंत यांनी त्यावेळी व्यक्त केलं.
नाना पटोले यांनी आत्मचिंतन करण्याचा सल्ला
नाना पटोले हे जसे काँग्रेसमध्ये कायम राहिले आहेत पदावर त्याप्रमाणे त्यांना आमदारकीवर राहता नाही फार झटापट करावी लागली ते पोस्टल मतांवर निवडून आले आहेत. माझी त्यांना मित्र म्हणून विनंती आहे की ते ज्या पद्धतीने व त्यांचे सहकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत आहेत त्यांना त्यांनी आवर घालायला पाहिजे व जो मतदान महाराष्ट्रातील जनतेने त्यांच्या पारड्यात टाकला आहे ते एवढं कमी का टाकले याचा आत्मचिंतन त्यांनी करावं असाही सल्ला सामंत यांनी दिला आहे.
कारागृहातील सावरकरांचे स्मारक आता 24 तास खुले
रत्नागिरीच्या कारागृहासाठी नऊ कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहेत त्याचा ओपग्रेडेशनचं काम सुरू आहे हे काम कशा पद्धतीने सुरू आहे यासाठी आपण आज भेट देऊन या कामाची पाहणी केली. यामध्ये कारागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कोठडीला ला आपण जे स्मारक मानतो ते आता 24 तास सावरकर प्रेमींना बघायला मिळणार आहे असा निर्णय आपण आजच घेतला असून ओपग्रेडेशनचं काम पूर्ण केल्यानंतर या स्मारकाला आता 24 तास भेट देता येईल. यासाठी मार्गही आपण दुसरीकडून चेंज करत आहोत अशी माहिती उदय सामंत यांनी दिली. तसेच शिरगाव येथील दामले यांच्या घरात स्वातंत्र्यवीर सावरकर राहिले होते त्याला सुद्धा शंभर वर्षे पूर्ण झाली त्या ठिकाणीही आपण भेट दिली मात्र या घराकडे जाणारा रस्ता अडचणीचा आहे तो रस्ताही करण्याचा निर्णय आपण घेतल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
सेमीकंडक्टर या मोठ्या प्रकल्पाचे काम सुरू
सुमारे 30,000 कोटी रुपयांचा सेमी कंडक्टरचा मोठा प्रोजेक्ट रत्नागिरीत आणला आहे त्याच काम सुरू आहे. आणखीन जागा हस्तांतरणाची प्रक्रिया ही सुरू आहे. त्यामध्ये मुलांना रोजगार प्रशिक्षण दिले जाणार आहे त्याची प्रक्रिया कंपनीच्या प्रशासनाकडून सुरू करण्यात आल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. राजापूर बारसू येथील रिफायनरी बाबत लोकांची जी भूमिका आहे मागणी आहे त्याप्रमाणे तेथे प्रकल्प आणला जाईल असे म्हणत रिफायनरी रद्दचे संकेत त्यांनी दिले आहेत. प्रमोद जठार यांनी केलेल्या मागणीबाबत ते म्हणाले की त्यांनी तिथे जाऊन लोकांचं मत बनवावं प्रकल्प आणण्यासाठी जर का लोकांचं मत झालं तर यासाठी त्यांना त्यांना शुभेच्छा आहेत तर सरकार त्यांच्याबरोबर राहील अशी स्पष्ट भूमिका सामंत यांनी मांडली.

आणखी वाचा