चिपळूण, दि. ०३ (प्रतिनिधी): कडवई वासियांचे प्रेम पुढील काळात जपण्याचे काम माझ्याकडून होईल कार्यकर्त्यांनी आपल्या पराभवाने खचून न जाता पुन्हा एकदा त्याच ताकतीने, जोमाने कामाला लागा असे आवाहन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा उद्योजक प्रशांत यादव यांनी कार्यकर्त्यांना केले.
कडवई पाटीलवाडी स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याबाबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत जाधव यांनी ग्रामस्थांना सोबत घेत काही महिन्यांपूर्वी प्रशांत यादव यांच्याकडे रस्ता करून देण्याची मागणी केली होती.अतिशय अरुंद वाट होती.पावसाळ्याच्या दिवसात या वाटेने जाताना अनेक अडचणींचा सामना स्थानिकांना करावा लागत होता ग्रामस्थांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन उद्योजक यादव यांनी त्यावेळी आपण स्वखर्चाने ८०० मीटरचा हा रस्ता करून देऊ असे आश्वासन दिले होते यानंतर या कामाला सुरुवात देखील झाली होती सोमवारी सायंकाळी या रस्त्याच्या लोकार्पण सोहळा पार पडला.या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रशांत यादव बोलत होते.
एक पराभव झाला म्हणजे आयुष्यात हारच येते असे नाही.एक लढाई हरलो म्हणजे थांबायचं नसतं पुन्हा एकदा जोमाने कामाला लागा कारण ज्या मतदारांनी इतक्या कमी कालावधीत माझ्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला पात्र ठरण्याचा पूर्ण प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिले.निवडणुकीच्या काळात सर्व भागात न पोहचूनही जे मतदारांनी प्रेम केलं आहे ते विसरणार नाही. आपलं ऋण जसं फेडता येईल तसा प्रयत्न नक्की करणार.चिपळूण संगमेश्वर मतदार संघात कुठेही पाणी पुरवठा,जिल्हा परिषद शाळा व स्मशानभूमीच्या कामाला माझे प्राधान्य असेल.पाटीलवाडीचा रस्ता आज जरी कच्चा असला तरी लवकरच तो पक्का करून देण्याचे आश्वासन प्रशांत यादव यांनी आपल्या भाषणात बोलताना दिले.
इचलेवाडी तांबडे गाव सभागृह, कडवई घोसाळकरकोंड स्मशानशेड, वाघजाई मंदिर छत बांधण्यासाठी मदत,देवरुख आगारातील दत्त मंदिर सुशोभिकरण आदी कामे प्रशांत यादव यांच्या स्वतः पुढाकाराने झाली आहेत.शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव, चिपळूण- संगमेश्वर राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्राध्यक्ष दत्ताराम लिंगायत,ज्येष्ठ शिवसैनिक चंद्रकांत जाधव, सेवादल जिल्हाध्यक्ष अन्वर जबले,चिपळूण तालुका राष्ट्रवादी खजिनदार शमुन घारे, गुलजार कुरवले,राष्ट्रवादी अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष फिरदोस सय्यद, शिवसेना संपर्क सचिव प्रकाश दुदम,तालुका उपाध्यक्ष उदय चाचे,काँग्रेस महिला आघाडी तालुकाध्यक्ष मिताली कडवईकर,प्रथमेश शिंदे,झीनत जुवळे,अनिस खान,संदीप चिले,गजानन ओकटे,सुमित पंडित,अनंत सुर्वे,सचिन जाधव,संजय मोहिते,मनोज शिंदे,मनोहर गुरव,शेखर जोगले,सुनिल करंडे,शिवराम मादगे,मारुती किंजळकर,ओकटेवाडी प्रमुख विष्णू ओकटे,गजांनंन ओकटे ,कृष्णा ओकटे,जिल्हा उपाध्यक्ष आसिम मोडक,सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र घोसाळकर,प्रकाश जाधव,कडवई माजी उपसरपंच संतोष जाधव, कडवई तंटामुक्ती अध्यक्ष महेंद्र जाधव, शांताराम सुर्वे,जयसिंग सुर्वे,तांबेडी शिवसेना शाखाप्रमुख राजेंद्र ब्रीद, सचिन नलावडे, राजवाडी ग्रामपंचायत सदस्य सोमा म्हादगे, सत्यवान सुर्वे, दीपक सुर्वे, विठ्ठल राणे, जगन्नाथ जाधव सूर्यकांत जाधव लक्ष्मण ओकटे, गोविंदओकटे, प्रकाश ओकटे,संतोष गोरीवले, विठ्ठल सुर्वे,संतोष सुर्वे,माजी सरपंच नंदकुमार मांजरेकर, वैभव चव्हाण,सुरेश मांडाटकर, सिकंदर नायकवडी, तुषार खताते, प्रणित पवार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.सुरेश सुर्वे,विक्रांत सुर्वे,शांताराम सुर्वे,शिवराम सुर्वे,प्रभाकर गायकवाड,कृष्णा भोसले,सुरेश देसाई,शांताराम चव्हाण,सुहासिनी सुर्वे,नंदा सुर्वे यांनी जागा उपलब्ध करून दिली याबद्दल प्रशांत यादव यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पाटीलवाडी ग्रामस्थांनी मेहनत घेतली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश कुंभार यांनी केले व आभार संतोष जाधव यांनी मानले. कडावई पंचक्रोशी मधील ओकटेवाडी,पाटीलवाडी, म्हादगेवाडी, तांबडवाडी,माजलेकर वाडी,राजवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.इचलेवाडी तांबडे गाव सभागृह, कडवई घोसाळकरकोंड स्मशानशेड, वाघजाई मंदिर छत बांधण्यासाठी मदत,देवरुख आगारातील दत्त मंदिर सुशोभिकरण आदी कामे प्रशांत यादव यांच्या स्वतः पुढाकाराने झाली आहेत.