चिपळूण, दि. १८ : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या पुढाकाराने उत्कृष्ट नियोजनामध्ये संपन्न झालेल्या समाज एकता चषक २०२५ चा कुणबी समाज भूमिपुत्र फायटर्स संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. टायगर योद्धा भंडारी समाज द्वितीय क्रमांकाचा विजयी तर तृतीय क्रमांकाचा स्वराज्य रक्षक मराठा समाज संघ विजयी संघ ठरला आहे.
एक समाज एक संघ अश्या नाविण्यपूर्ण स्पर्धेचा थरार मागील चार दिवसांपासून गोल्डन पार्क तळी मैदान येथे सुरू होता,शेवटच्या दिवशी खेळणाऱ्या मातब्बर संघाना चितपट करत अखंड कुणबी समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भूमिपुत्र फायटर्स या संघाने प्रथम क्रमांक रोख रक्कम १ लाख रुपयाचे बक्षीस जिंकले.जातीपातीच्या भिंती पलीकडे जाऊन मनसे संपर्क प्रमुख अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी एक वेगळा आदर्श घालून दिला आहे.एक समाज एक संघ ही संकल्पना सर्व समाजासाठी आदर्शवत अशी ठरली आहे.
स्पर्धेमध्ये मालिकावीर ओंकार बागकर (भंडारी समाज),उत्कृष्ट गोलंदाज बाबा मोरे (कुणबी समाज), उत्कृष्ट फलंदाज दत्तू सावंत (भंडारी समाज), उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सुदर्शन मयेकर (भंडारी समाज), सर्वाधिक चौकार यश लोखंडे (कुणबी समाज), सर्वाधिक षटकार दत्तू सावंत (भंडारी समाज),उगवता तारा स्वप्निल कांबळे (भूमिपुत्र कुणबी), अंतिम सामन्यातील सामना वीर सागर म्हसकर (भूमिपुत्र कुणबी), लक्षवेधी खेळाडू प्रथमेश वेद्रे (कुणबी समाज) म्हणून या खेळाडूंना मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर आणि मान्यवर मंडळींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सोमवारी सायंकाळी झालेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्या नंतर लगेचच बक्षीस वितरण करण्यात आले.बक्षीस वितरण समारंभासाठी मनसेचे राज्य सरचिटणीस माजी नगराध्यक्ष अँड. वैभव खेडेकर, मनसे जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे, गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, संजय आखाडे, तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, वैश्य वाणी समाज तालुकाध्यक्ष प्रशांत शिरगावकर,चिपळूण तालुका अध्यक्ष विश्वनाथ डोळस, खेड तालुका अध्यक्ष निलेश बामणे, चिपळूण तालुका सचिव संदेश साळवी, विभाग प्रमुख जयेश गुहागरकर, हमिद सय्यद, सह संपर्क अध्यक्ष समीर जोशी, उद्योजक ओंकार संसारे, सुरेंद्र निकम, उपतालुका अध्यक्ष जितेंद्र साळवी,अमित खांडेकर, सुनील मूकनाक, राहुल जाधव, पाटपन्हाळे सरपंच विजय तेलगडे, उपसरपंच असीम साल्हे, प्रशांत साटले, चंद्रकांत विचारे, कुणबी समाजाचे अध्यक्ष पांडुरंग पाते, माजी अध्यक्ष रामचंद्र हुमणे गुरुजी, कुणबी नेते राजेश बेंडल, कुणबी युवा अध्यक्ष मंगेश मते, राजेंद्र गोंजारे, सचिव सूचित मालप, खजिनदार सुशांत बारस्कर, युवा पदाधिकारी वैभव आदवडे, वैभव बागवे, संदीप मांडवकर,बबलू आग्रे,विजय बारगोडे,दिनेश बारगोडे, संतोष सोलकर आदी मान्यवर उपस्थित होते.या स्पर्धेमध्ये खारवी समाज (सागरी योद्धा), भंडारी समाज (टायगर योद्धा), सुतार समाज (विराट विश्वकर्मा), भाविक गुरव समाज (जीपीएल यंग स्टार),मुस्लिम समाज (आझाद रॉयल फायटर्स), वैश्य वाणी समाज (कोकण कट्टा), नंदीवाले समाज (श्री तिरुपती बालाजी), तेलीसमाज (जय संताजी), बौद्ध समाज (ब्लू पँथर्स), बेलदार समाज (ओम साई इलेव्हन), कुणबी समाज (भूमिपुत्र फायटर्स), मराठा समाज(स्वराज्य रक्षक) असे एकूण १२ संघ सहभागी झाले होते.
या स्पर्धेला पंच म्हणून अमित खांडेकर, अक्षय कोळंबेकर, सलीम कोतवडेकर तरbसमालोचक म्हणून अमित आदवडे, सिद्धेश उत्तेकर, सिद्दीक मेमन,असीम साल्हे यांनी काम केले.भूमिपुत्र फायटर्सचा कर्णधार प्रथमेश वेद्रे याच्या नेतृत्वाखाली खेळताना सर्व कुणबी खेळाडूनी उत्कृष्ट कामगिरी करत जिगरबाज खेळ केला.