रत्नागिरी, दि. ७ (अंकुश कदम): कोकण किनाऱ्यावरील तरुणाईसाठी नवा उत्साह निर्माण करणारा क्षण म्हणजे रत्नागिरीत झालेलं मोटोहाउस शोरूमचं भव्य उद्घाटन. केएडब्ल्यू वेलोस मोटर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमामुळे जागतिक स्तरावरील प्रीमियम ब्रिक्स्टन मोटरसायकल्स आणि अत्याधुनिक व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर्स आता रत्नागिरीकरांच्या आवाक्यात आल्या आहेत. या शोरूमचे लोकार्पण राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले.
ब्रिक्स्टन बाइक्स त्यांच्या अनोख्या डिझाइनसाठी आणि दमदार परफॉर्मन्ससाठी जगभरात लोकप्रिय आहेत. क्रॉसफायर 500एक्स आणि 500एक्ससी तसेच क्रॉमवेल 1200 आणि 1200एक्स ही मॉडेल्स खासकरून टूरिंग, ॲडव्हेंचर रायडिंग आणि शहरी प्रवासासाठी उपयुक्त ठरणारी आहेत. एलईडी लाइटिंग, एबीएस ब्रेकिंग सिस्टम, ब्रेम्बो-सह जे जुआन ब्रेक्स आणि केवायबी सस्पेन्शन या आधुनिक वैशिष्ट्यांमुळे सुरक्षिततेसह राइडिंगचा अनुभव अधिक आनंददायी होणार आहे.
दरम्यान, इटलीत डिझाइन करण्यात आलेली व्हीएलएफ टेनिस इलेक्ट्रिक स्कूटरही शहरी प्रवाशांना वेगळा अनुभव देण्यासाठी सज्ज झाली आहे. हलक्या वजनाची ही स्कूटर एका चार्जमध्ये तब्बल १३० किलोमीटरपर्यंत धावू शकते. काढता येणारी बॅटरी, मोठे टायर्स आणि तीन रायडिंग मोड ही तिची खास वैशिष्ट्ये असून पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी ही स्कूटर एक आकर्षक पर्याय म्हणून समोर येत आहे.
मोटोहाउसचे व्यवस्थापकीय संचालक तुषार शेळके यांनी सांगितले की, मोटोहाउस हे केवळ डीलरशिप नसून जागतिक दर्जाचा रायडिंग अनुभव भारतीय बाजारपेठेत आणण्याचा एक संकल्प आहे. ग्राहक समाधान, टिकाऊपणा आणि परफॉर्मन्स या तीन गोष्टींना केंद्रस्थानी ठेवून आम्ही विस्तार करत आहोत. रत्नागिरीसारख्या दुचाकीप्रेमी भागात आमची उपस्थिती विशेष महत्त्वाची ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या प्रीमियम शोरूममध्ये विक्रीसोबतच दर्जेदार सर्व्हिसिंग आणि वर्कशॉपची सुविधाही देण्यात आली आहे. ब्रिक्स्टन मोटरसायकल्ससाठी २ वर्षांची स्टँडर्ड वॉरंटी आणि अतिरिक्त २ वर्षांची एक्सटेंडेड वॉरंटी तर व्हीएलएफ स्कूटरसाठी २ वर्षांची वाहन वॉरंटी आणि ३ वर्षांची बॅटरी वॉरंटी उपलब्ध करून देण्यात आली आहे. किंमतीकडे पाहिल्यास व्हीएलएफ टेनिस स्कूटरची सुरुवात १,२९,९९९ रुपयांपासून होत असून, ब्रिक्स्टन क्रॉसफायर 500एक्स आणि 500एक्ससीची किंमत ४,७४,१०० रुपये, क्रॉमवेल 1200 ची ७,८३,९९९ रुपये तर मर्यादित १०० युनिट्समध्ये उपलब्ध असलेल्या क्रॉमवेल 1200एक्सची किंमत ९,१०,६०० रुपये इतकी आहे.
१९६२ मध्ये स्थापन झालेल्या केएडब्ल्यू ग्रुपच्या वारशातून उभ्या राहिलेल्या या संकल्पनेमुळे आता कोकणात प्रीमियम









