‘आस्था’ सोशल फाउंडेशनच्या कामाचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून कौतुकपूर्वक निरीक्षण

रत्नागिरी, दि. ०३ (प्रतिनिधी): दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव मा. तुकाराम मुंढे यांच्या निर्देशांनुसार जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी कार्यरत संस्थांची पाहणी करण्याचे काम जिल्हा परिषद रत्नागिरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. वैदेही रानडे (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. त्यानुसार शुक्रवार, दि. 28 नोव्हेंबर 2025 रोजी रत्नागिरीतील दिव्यांग पुनर्वसन क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या आस्था सोशल फाउंडेशन, रत्नागिरी या संस्थेच्या उपक्रमांची पाहणी करण्यात आली.

मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या नेतृत्वाखालील समितीने आस्थाच्या दिव्यांग हेल्पलाईन, आस्था थेरपी सेंटर तसेच फिरते श्रवण चाचणी कक्ष या प्रकल्पांचे कामकाज प्रत्यक्ष पाहून माहिती घेतली. दिव्यांगांसाठी सातत्याने आणि प्रभावीपणे चालणाऱ्या या सेवांबद्दल समितीने समाधान व्यक्त केले.

या पाहणी समितीत जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी मा. सुनीता शिरभाते, तसेच वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता श्री. संजय बलाढये यांचा समावेश होता. संस्थेच्या सचिव श्रीमती सुरेखा पाथरे, श्री. संकेत चाळके, आणि श्रीमती संपदा कांबळे यांनी विविध प्रकल्पांची माहिती समितीसमोर मांडली.

दिव्यांग सक्षमीकरणासाठी जिल्हा प्रशासन आणि सामाजिक संस्थांमधील समन्वय अधिक बळकट होत असल्याचे या भेटीतून दिसून आले.

आस्था थेरपी सेंटर च्या कामाची पाहणी करतांना समिती सदस्य..
आस्था फिरते श्रवण चाचणी केंद्रा ची माहिती घेतांना समिती सदस्य

आणखी वाचा