चिपळूण(खेर्डी), दि. ०२ : वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार व समाजात श्रद्धास्थान असलेले ह. भ. प. कृष्णा महाराज फाळके (खेर्डी) यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायासह खेर्डी परिसरावर शोककळा पसरली आहे.
ह. भ. प. कृष्णा महाराज फाळके यांनी आयुष्यभर हरिभक्ती, कीर्तन, प्रवचन आणि सामाजिक प्रबोधनाच्या माध्यमातून समाजात भक्तीभाव, सदाचार व एकात्मतेचा संदेश दिला. त्यांच्या कीर्तनातून अनेकांना जीवनमार्गदर्शन मिळाले असून, ते साधेपणा, सेवाभाव आणि अध्यात्मिक विचारांसाठी ओळखले जात होते.
त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार मंगळवार, दिनांक ३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ८.०० वाजता खेर्डी देऊळवाडी स्मशानभूमी येथे करण्यात येणार आहेत.
या अंत्यसंस्कारासाठी सर्व नातेवाईक, ग्रामस्थ, वारकरी संप्रदायातील भाविक तसेच हितचिंतकांनी वेळेवर उपस्थित राहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
ह. भ. प. कृष्णा महाराज फाळके यांच्या निधनाने एक निष्ठावान वारकरी, समाजप्रबोधन करणारा संतवृत्तीचा व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना ग्रामस्थ व भाविकांनी व्यक्त केली आहे.








