मोहन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आकले येथील सन १९९८-९९ बॅचच्या मित्रमैत्रिणींचा स्नेहमेळावा; डॉ. राजेंद्र राऊत यांचा विशेष सत्कार

चिपळूण, दि. १६ : मोहन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, आकले येथील सन १९९८-९९ बॅचमधील सर्व मित्रमैत्रिणी एकत्र येऊन आपल्या मित्राचा गौरव करताना भावनिक क्षणांचा अनुभव घेतला. दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी दहावीमध्ये एकत्र शिक्षण घेतलेल्या मित्रांपैकी मुंबई विद्यापीठ संचलित व महाराष्ट्र तसेच केंद्र शासन पुरस्कृत विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, आंबवडे येथे माहिती तंत्रज्ञान विभागप्रमुख म्हणून कार्यरत असलेले डॉ. राजेंद्र राऊत यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

डॉ. राऊत यांनी संगणकशास्त्र विषयात “Analyzing Different Issues in Implementing IoT Based Subjective Examination System” या विषयावर पीएच.डी. पदवी संपादन केल्याबद्दल मित्रपरिवाराने त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव केला.

या प्रसंगी सर्व मित्रमैत्रिणींनी जुन्या शालेय आठवणींना उजाळा देत एकमेकांशी मनमोकळा संवाद साधला. भविष्यातही अशीच मैत्री टिकवून ठेवण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला. आपल्या मित्राने शैक्षणिक क्षेत्रात उच्च पदावर पोहोचल्याचा आनंद सतीश सकपाळ, अभिजित दुधाळ, सचिन पवार, इकबाल चिपळूणकर, संतोष जाधव, प्रतीक्षा शिंदे व राकेश साळुंखे यांनी व्यक्त केला.

हा सोहळा चिपळूण येथील हॉटेल आरंभ येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाजसेवक विनेश भाऊ मोहिते यांनी सर्व मित्रमैत्रिणींचे आभार मानले.

मैत्री, सन्मान आणि अभिमानाचा संगम ठरलेला हा कार्यक्रम उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला.

आणखी वाचा