आकले गुरववाडीत श्री ज्ञानेश्वर माऊलींचा ३२ वा अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न

चिपळूण, दि. १८ : आकले गुरववाडी येथे श्री ज्ञानेश्वर माऊलींचा ३२ वा अखंड हरिनाम सप्ताह यंदाही मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला. १४ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर या चार दिवस चाललेल्या या धार्मिक उत्सवात भजन, अभंग, कीर्तन यांसारख्या कार्यक्रमांनी गावात आध्यात्मिक माहोल निर्माण केला होता.

गुरववाडीतील ग्रामस्थ दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत होते. या निमित्ताने मुंबई, पुणे आदी ठिकाणी नोकरीनिमित्ताने राहणारे अनेक तरुण गावात दाखल झाले होते. परंपरा जपण्याचा उत्साह आणि गावातील ऐक्य यामुळे गावात आनंदोत्सवाचे वातावरण होते.

सप्ताहाला भेट देत समाजसेवक विनेश भाऊ मोहिते (मुख्य प्रवर्तक – सामाजिक विकास ग्रुप) यांनी ग्रामस्थांची भेट घेत सर्वांना मंगलमय शुभेच्छा दिल्या. त्यांच्या उपस्थितीने ग्रामस्थांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला.

सलग ३२ वर्षे अखंडपणे सुरू असलेला आकले गुरववाडीचा हरिनाम सप्ताह आजही गावाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा केंद्रबिंदू ठरत असून गावाच्या जडणघडीत मोलाचे योगदान देत आहे.

आणखी वाचा