अवैध उत्खनन व नियमबाह्य वाहतुकीवर कारवाई करण्याचे आदेश असूनही अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला दाखविली कैराची टोपली

२६ जानेवारी रोजी ग्रामस्थांसह उपोषणाला बसणार : मुश्ताक मिरकर 
चिपळूण, दि. १४ (प्रतिनिधी):   दापोली तालुक्यातील मौजे रोवले आणि उंबरशेत येथून होत असलेल्या बॉक्साइड उत्खननाबाबत लोकशाही दिनी आलेल्या तक्रारीवर उत्तर देताना जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी संबंधित विभागाला कारवाईच्या सक्त सूचना देऊनही अधिकारी वर्गाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्यामुळे तक्रारदार ग्रामस्थ मंडळी पुन्हा एकदा आक्रमक झाली असून आंदोलनकर्ते सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक मिरकर हे २६ जानेवारी रोजी मंडणगड तहसीलदार कार्यालयाबाहेर उपोषणाला बसण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम राहिले आहेत. आपण उपोषणाला बसणार असल्याचे मिरकर यांनी सांगितले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की दापोली तालुक्यातील मौजे रोवले उंबरशेत येथून उत्खनन होणाऱ्या बॉक्साईड खनिजाची होणाऱ्या ओव्हरलोड वाहतूकीचा त्रास मांदिवली ,चिंचघर,देव्हारे,मंडणगड, कुंबळे येथील ग्रामस्थांना होत आहे,धुळीचा त्रास,रस्त्याची खराबी,शेत जागेतून वाहतूक,खाजगी जागेत नासधूस अशा अनेक प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न अवैद्य उत्खनन करणारे व नियमबाह्य वाहतुकीमुळे होत आहे. शासनाच्या आरटीओ विभागाचे वाहतुकीचे नियम अक्षरशः धाब्यावर बसवून अवैद्य वाहतूक सुरू असल्याचा आरोप करीत या बाबत मंडणगड तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा मंडणगड पंचायत समिती माजी सदस्य मुश्ताक मिरकर यांनी ग्रामस्थ मंडळींना एकत्र करीत उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्या सर्वच संबंधितांनच्या विरोधात मागील काही दिवसांपासून तीव्र आंदोलन छेडले आहे.या बाबत मिरकर यांनी लोकशाही दिनात तक्रारही केली होती
 या तक्रारीची गंभीर दखल घेऊन मौजे रोवले व उंबरशेत येथे खाणकाम मध्ये चालणारे अवैध उत्खनन आणि नियमबाह्य वाहतुकीबाबत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि दापोली प्रांताधिकाऱ्यांनी तपासणी करुन त्वरित कारवाई करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी सोमवार दिनांक १ जानेवारी रोजी रत्नागिरी येथे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या लोकशाही दिनाच्या बैठकीत  दिली होती यावेळी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, सर्वसाधारण उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी,   राहूल देसाई आदी उपस्थित होते. तसेच क्षेत्रीय स्तरावरील उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.जिल्हाधिकारी सिंह यांनी प्राप्त झालेल्या प्रत्येक अर्जाबाबत माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना

 सूचना केल्या. या बाबत पुढे अधिक माहिती देताना मुश्ताक मिरकर यांनी सांगितले की दापोलीतील रोवले, उंबरशेत येथे बॉक्साईड चे उत्खनन मोठ्या प्रमाणात केले जाते येथून डंपर मध्ये वाहनाच्या शमतेपेक्षाही दुप्पट प्रमाणात बॉक्साइड डंपर मध्ये भरून पुढे त्याची वाहतूक रोवले, उंबरशेत, मांदीवली चिंचघर , देव्हारे, मंडणगड, पालघर,कुंबळे,वळवटे, लाटवण या गावातून करंजाडे रेल्वे स्टेशन महाड पर्यंत ही वाहतूक केली जाते या गावातील अरुंद रस्त्यातून दिवसाला सुमारे १५० डंपर द्वारे वाहतूक केली जाते.या मध्ये बाहेगावाहून आणलेल्या कागदपत्र अपूर्ण असलेल्या अनेक गाड्यांचा यात समावेश आहे.या आधीही ग्रामस्थानी अनेकवेळा याबाबत आंदोलने केली आहेत.भविष्यात येथे अपघात घडल्यास जबाबदारी कोण घेणार असा संतप्त सवालही मिरकर यांनी शासनाला विचारला आहे.या मार्गात येणाऱ्या गावांतील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.ओव्हारलोड वाहतूक करणाऱ्या वाहनावर बंदी घालण्यात यावी ,विनापरवाना उत्खनन वर कारवाई करावी, वाहतुकीला परवाना देऊनच वाहतूक व्हावी या मागणीसाठी मिरकर २६ जानेवारी रोजी उपोषणाला बसणार आहेत.दिवसरात्र ओव्हरलोड वाहनाची वाहतूक सुरू असून पोलिस स्टेशन,तहसील कार्यालय येथून काही मीटर अंतरावर या गाड्या जात असताना शासस्तरावरून डोळेझाक केली जाते येथे आरटीओ अधिकारी कारवाई करण्यासाठी येणार असतील त्याच दिवशी याची खबर अवैध्य वाहतूक करणाऱ्या डंपर मालकांना काहितास आधीच मिळते मग या दिवशी गाड्या भरल्या जात नाही.असा खळबजनक आरोप काँग्रेस पक्षाचे नेते मुश्ताक मिरकर यांनी केला आहे.

आणखी वाचा