ठाणे, दि. 11(जिमाका):- सिडको महामंडळातर्फे साकारण्यात येत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नैना शहर या प्रकल्पांमध्ये महाराष्ट्राला देशाचे पॉवर हाऊस बनविण्याची क्षमता आहे, असे प्रशंसोद्गार मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी आज वाशी, नवी मुंबई येथे काढले.